Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

लोणार नगर परिषदेच्या सर्व शाळांमध्ये के.जी-१ आणी के.जी-२ सुरू होणार!

Responsive Ad Here

मो.असलम परवेज: लोणार प्रतिनिधी


विद्यार्थ्यांना मिळणार मोफत स्कूल बॅग


     आपला पाल्य नगरपालिकेच्या मराठी किंवा उर्दू शाळेत शिकत असेल तर पालकांनी कोणतीही चिंता  करता कामा नये. विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची कमतरता पडू देणार नाही, त्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळा पैकी दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि सोयीस्कर व मोफत शिक्षण उपलब्ध करून देण्यास नगरपालिका सक्षम आहे. अशी प्रतिक्रिया शिक्षण सभापती बादशाह खान यांनी शिक्षक-पालक सभेला संबोधित करतांना व्यक्त केली.

             दिनांक ६ एप्रिल २०२२ रोजी शिक्षक, नगरपालिका अधिकारी - पदाधिकारी तसेच पालक वर्ग यांचे एकत्रित सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. चालू शैक्षणिक वर्षाच्या घडामोडीवर प्रकाश टाकून यामध्ये कोरोना परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरपाई पुढील शैक्षणिक सत्रामध्ये करण्याबाबत नियोजन आखण्यात आले. सदर सभेचे अध्यक्ष स्थानी नगरपालिका उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती नूर मोहम्मद खान उर्फ बादशाह सेठ हे होते. या सभेमध्ये सर्वानुमते विचारविनिमय करून येत्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता शिक्षण समितीच्या वतीने शैक्षणिक विकास आराखडा आखण्यात आला.              


    नगरपालिकेच्या सर्व सहाही शाळांमध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण सुरू करणे, सर्व विद्यार्थ्यांना मोफत शालेय बँग उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांना जाण्या येण्याकरिता स्कूल बसची व्यवस्था करणे, आझाद नगर मधील शाळेकरिता अनुदान उपलब्ध करणे, येत्या शैक्षणिक वर्षापासून वर्ग ९वा व १०वा सुरू करणे, शाळांच्या प्रगतीकरिता शाळा विकास अभ्यास समितीची नेमणूक करणे, शाळांच्या प्लेग्राउंड मध्ये गट्टू बसून शाळेची सुशोभिकरण करणे, नगरपालिकेच्या के.जी-१ आणि के.जी-२ या वर्गांना अनुदान उपलब्ध करणे इत्यादींसारखे विषयाबाबत समज पूर्वक नियोजन करण्यात आले.

                  या वेळी बादशाह सेठ, राजूभाऊ मापारी, भूषण भाऊ मापारी, साहेबराव पाटोळे, आबेद खान, प्राध्यापक गजानन खरात, संतोष भाऊ मापारी, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, गटशिक्षणाधिकारी राजगुरू सर, प्रशासनाधिकारी कापुरे सर, नगरपालिकेच्या सर्व शिक्षक वृंद, सहा शाळांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष-उपाध्यक्ष तथा सदस्य आणि बहुसंख्य पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.