एरंडोल प्रतिनिधी कविराज पाटील
दि १०/४/२२रविवार रोजी एरंडोल येथे महात्मा फुले युवा क्रांती मंच व सत्यशोधक समाज समीती यांच्या संयोजनातुन तात्यासाहेब ज्योतिबा फुले जयंती निमित्त प्रबोधन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. RTI जळगाव जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वाघ यांची नियुक्ती झाल्या बद्दल त्यांचा सत्कार पुस्तक देवुन प्रा विश्वास पाटील, अंमळनेर व प्रा सुधाकर बडगुजर, भुसावळ यांनी केला. कार्यक्रमाचे विचारमंचा वर उपस्थित मान्यवर अध्यक्ष माजी तहसिलदार अरुण माळी कार्यक्रमाचे उद्धाटक माजी नगर आध्यक्ष देविदास महाजन तसेच कार्यक्रमाचे वक्ते डॉ सुरेश झाल्टे सत्यशोधक समाज प्रचारक महाराष्ट्र मनोगत प्रा, विश्वास पाटील राष्ट्रीय किसान मोर्चा अमळनेर व प्रा सुधाकर बडगुजर सत्यशोधक समिती भुसावळ, कार्यक्रमाचे स्वरुप व मान्यवरांचे परिचय प्रा पी डी पाटील धरणगाव यांने केले .
ब्राम्हणी व्यवस्थेला कडाडुन विरोध करुन विद्रोही साहित्य लीहणारे व समाजाला मानसिक भावनिक गुलामीतीतुन मार्गदर्शन करणारे ज्योतिबा देवधर्माचे मध्यस्ती बनुन ब्राम्हणी संस्कार बहुजनांच्या घराघरात परंपरा पिढ्या बरबाद करुन शिक्षणा पासुन वंचित ठेवले गेले होते, त्यांना शिक्षण देण्याच कार्य ज्योतिबांनी केले, सत्यशोधक समाज घडवुन सत्यधर्म परिवर्तन शोषीतांसाठी प्रबोधन ज्योतिबांनी केले, बहुजनांचे दैवत कोन व संस्कृती कशी आहे हे प्रतिपर्शी प्रबोधन व कार्यक्रमाला उपस्थित लोकांना आव्हान डॉ सुरेश झाल्टे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतिसबंधीत आमलात आनलेले धोरण हे आताच्या सरकारांनी आमलात आनावे त्या शिवाय देशाची व शेतीची प्रगती होणार नाही , महापुरुषांचे विचारातून गुरुशीष्य परंपरा कशी आहे व ते विचार जनमानसाच्या कल्याणासाठी आहेत , रविवार हा सुट्टीचा दिवस मिळावा असे प्रतिपत्र ब्रिटीश सरकारला ज्योतिबांनी केले असे संबोधन प्रा विश्वास पाटील यांनी केले.समाजात सत्यशोधक परिवर्तन काळाची गरज आहे व महापुरपषांचे विचारांची चळवळ ही घराघरात पोहचली पाहीजे असे आव्हान कार्यक्रमाचे अध्यक्ष मा तहसिलदार अरुण माळी यांनी केले.
दि, ११/४/२२ रोजी माळी वाडा येथिल महात्मा ज्योतिबा फुले स्मारकाचे सुशोभीकरण करुण समाजबांधवांना माल्यार्पण करुन सकाळी ९ वाटेला मोटरसायकल रँली शहरात काढण्यात आली, तसेच महात्मा ज्योतिबा व माई सावित्री यांची वेषभूषा परिधान करुण शहरात शोभायात्रा व लेझीम पथक काढण्यात आले होते कार्यक्रमाचे नियोजन व आयोजक महात्मा फुले युवा क्रांती मंच सत्यशोधक समाचार चळवळ समीती यांनी केले.
