कविराज पाटील प्रतिनिधी एरंडोल
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डाॅ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मालेगाव येथे अनेक चांगले उपक्रम राबविण्यात आले, तसेच भव्य मिरवणुका देखील चांगल्या प्रकारे Dj, ढोल, तासे, यांचा मिरवणुकीत समावेश होता, व मिरवणुकीला असंख्य जनसमुदाय उपस्थित होता,शिका संघटित व्हा संघर्ष करा.
असा एक मूलमंत्र, महामानव (भारतरत्न )डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांचा होता, तलवारीच्या धारेपेक्षा लेखणीची धार कायम टिकणार आहे आणि ते सर्वात खतरनाक शस्र आहे म्हणून तलवार हातात न घेता लेखणी हातात घेऊन अन्यायावर मात करा.माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार संविधानाद्वारे देणारे
महामानव, विश्वभूषण, बोधिसत्व, भारतरत्न, बॅरिस्टर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र कोटी कोटी अभिवादन,मालेगाव च्या असंख्य जनसमुदायाकडून फुलांचा वर्षाव व रंगेबेरंगी फटाके आकाशाच्या दिशेकडे फोडून वंदन करण्यात आले,अश्या प्रकारे महामानव (भारतरत्न) डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली .
