मो.असलम परवेज : लोणार तालुका प्रतिनिधी
लोणार मंठा रोडवरील वडगाव सरहद गावा जवळ दि.२७/०४/२०२२ रात्री ११ च्या सुमारास तळणी कडून येणारे रेतीचे टिपर व अशोक लिलेडचे टेम्पो या मध्ये समोरा समोर धडक झाली. ही धडक इतकी भयानक होती की दोन्ही गाड्याचे चुरा होऊन सर्व चाक तुटून पडले. या मध्ये टेम्पो क्रमांक एम. एच ३७ बी १७२४ चा चालक सचिन विष्णू खंदारे रा. कानडी तालुका मंठा हा गंभीर जखमी झाला. त्याला जालना येथे उपचारासाठी नेत असतांना त्याची प्राण ज्योत मावळली.
![]() |
"भरधाव रेती टिप्पर वाहनाची टेम्पोला धडक: एक ठार एक जखमी" |
"वडिलांचा आधार गेला"
कानडी येथील विष्णू खंदारे यांच्याकडे टेम्पो असून या वर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता. सचिन खंदारे वय २२ वर्ष हा वडिलांना मदत व्हावी म्हणून टेम्पो चालवायचा, परंतु आई वडिलांचा एकुलता एक सचिन हा या अपघाताने त्यांच्या कडून हिरावून घेतला व त्यांचा आधार गेला. या घटनेची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली. सचिन अगदी हसमुख व प्रेमळ स्वभावाचा असल्याने सर्व सर्वांना एकच धक्का बसला.
