Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांच्या प्रयत्नांना यश

Responsive Ad Here

 कविराज पाटील एरंडोल


एरंडोल शहराचा प्रमुख मार्ग असणाऱ्या अंजनी नदी काठावरील कासोदा दरवाजा ते श्री महादेव मंदिर रस्ता संरक्षण भिंत, विद्युतीकरण, वृक्षारोपणासह सुशोभिकरणास पाच कोटी मंजुर 


एरंडोल - शहरातील अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जाणाऱ्या अंजनी नदी काठावरील कासोदा दरवाज्यापासुन ते श्रीमहादेव मंदीरापर्यंतचा रस्ता विकासासाठी शहरवासियांची मोठी मागणी होत होती. ह्या रस्त्याची मोठी दुरावस्था झाल्यामुळे इतर दिवसांसह पावसाळ्यात नदीचे पाणी रस्तावर येवून दुर्गंधी पसरणे, मोठे-मोठे खड्डे यांसह इतर समस्यांनी नागरीक त्रस्त झाले होते. ह्या रस्त्याची दुरूस्ती व्हावी यासाठी नागरीक सतत आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांचेकडे मागणी करित होते. ह्या रस्त्याची तातडीने दुरूस्ती व्हावी व नागरीकांना उद्भवणाऱ्या समस्या दुर व्हाव्यात यासाठी आमदार


 मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील राज्याचे नगरविकासमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे साहेब यांचेकडे पाठपुरावा करीत होते. याची मा.मंत्री महोदयांनी दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या शासन निर्णय क्र. नपावै-२०२२/प्र.क्र. ६६(अ-८६)/ नवि-१६ दि.३० मार्च २०२२ या आदेशान्वये वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत एरंडोल नगरपरिषद हद्दीतील अंजनी नदीच्या काठावरील कासोदा दरवाज्यापासुन ते श्रीमहादेव मंदीरापर्यंत रस्ता, संरक्षण भिंत, विद्युतीकरण, वृक्षारोपणासह सुशोभिकरण करणेसाठी पाच कोटी रूपयांचा निधी मंजुर केला आहे. या निर्णयामुळे एरंडोल शहरवासियांची दैनंदिन मोठी समस्या दुर होणार असल्याने मतदारसंघाच्या वतीने आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.उद्धव साहेब ठाकरे, नगरविकासमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे यांचे आभार मानले आहेत. तसेच एरंडोल शहरवासियांनी आनंद व्यक्त करत आमदार मा.आबासाहेब चिमणरावजी पाटील यांचे आभार मानले आहे.