गणेश महाजन एरंडोल तालुका प्रतिनिधी
एरंडोल:येथे मातोश्री नगर व आदर्श नगरात अज्ञात चोरट्यांनी ३०मार्च २०२२ रोजी भल्यापहाटे तीन ठिकाणी घरफोडी करून १लाखांचा ऐवज लंपास केला.घरफोडीच्या घटनेमुळे नविन वसाहतींमधील नागरीकांमध्ये घबराट पसरली आहे. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन ला अजून गुन्हा दाखल झालेला नाही.मातोश्री नगरातील रहीवासी शंकर गोसावी यांच्या घरातुन अज्ञात चोरट्यांनी ४०हजार रूपये रोख,१तोळे सोने व १०हजार रूपये किंमतीचे चांदीचे दागीने याप्रमाणे ऐवज लांबविला. याच भागातील संदीप पाटील यांच्या घरातील देव्हार्यातुन देवाच्या चांदीच्या मुर्त्या लंपास करण्यात आल्या.
आदर्श नगरात माध्यमिक शिक्षक आर.एम.कुलकर्णी यांच्याकडील घरफोडीत ८हजार रूपये रोख,७ग्रँम सोने चोरून अज्ञात चोरटे पसार झाले. दरम्यान.शंकर गोसावी यांनी एरंडोल पोलीस स्टेशन ला तक्रार अर्ज दिलेला आहे.ज्याप्रमाणे पावसाळा या रूतूत बदल झाला तसाच बदल चोरांच्या टोळीत झालेला दिसून येतो. फार पूर्वी उन्हाळ्याच्या दिवसात चोर्यांच्या घटना जास्त घडत होत्या.माञ गेल्या काही वर्षांपासून वर्षभरात पावसाळा असो, हिवाळा असो चोरीच्या घटना या सूरूच असतात. चोरांच्या जगतात हे परीवर्तन झालेले आढळुन येते.