लोणार : प्रवाशांच्या सोयीसाठी दिवसरात्र झटणाऱ्या येथील प्रवासी सेवा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या अंथक प्रयत्नाने लोणार येथून अनेक बसफेऱ्या सुरू झाल्या आहेत. तसेच जागतिक किर्तीच्या ‘अ’ दर्जा प्राप्त पर्यटन स्थळ लोणार करिता सातारा विभागाची फलटण-लोणार ही नवीन बसफेरी २ मे रोजीपासून प्रवासी, पर्यटक, व्यापारी, विद्यार्थी, भक्तगण या सर्वांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आली आहे.
![]() | ||
| "प्रवाशांनी जास्तीत जास्त या फेरीचा लाभ घ्यावा: उस्मान शेख" |
सदर फेरी फलटण येथून सकाळी ८.३० वाजता निघून ती बारामती, कर्जत, भिगवण, राशन, जामखेड, पाटोदा, बिड, गेवराई, अंबड, जालना, नाव्हा, सिंदखेड राजा, किनगांव राजा, दुसरबिड, बिबी, सुलतानपू मार्गे लोणार येथे रात्री ८.३० वाजता मुक्कामी पोहचते, तर लोणार येथून सकाळी ६.४५ वाजता निघून ती फलटण येथे सायंकाळी ५.३० वाजता पोहचते. प्रवाशांच्या सेवेसाठी सदर फेरी सुरू केल्याबद्दल महाव्यवस्थापक सुहास जाधव, उपमहाव्यवस्थापक अजित गायकवाड, विभाग नियंत्रक सागर पळसुले, विभागीय वाहतुक अधिकारी सौ. ज्योती गायकवाड, फलटण आगाराचे आगार व्यवस्थापक वाडेकर यांचे प्रवाशांच्या वतीने प्रवाशी सेवा संघटनेने आभार व्यक्त केले. तसेच सदर फेरीचा लाभ घेवून फेरीच्या उत्पन्नात वाढ करून फेरी कायम स्वरूपी सुरू ठेवण्यासाठी सहकार्य करावे, अशी प्रवाशांना विनंती देखील करण्यात आली आहे.
