योगेश कुमार सोनवणे ग्रामीण प्रतिनिधी
मलकापुर शहरातील गांधी नगर येथील १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना २२मे रोजी उघडकिस आली. याबाबत सविस्तर वृत्त असे कि गायत्री रविन्द्र उगले (१८ वर्ष) राहणार गांधी नगर मलकापुर ही घरी काही न सांगता निघुन गेली रात्रि उशिरा पर्यंत घरी न आल्याने तिच्या मैत्रीणी व नातेवाईकांकडे चौकशी केली असता ती कोणाकडे न मिळाल्याने याबाबतची तक्रार तिचे वडिल रविंद्र उगले यांनी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात हकिकत सांगुन तक्रार दाखल केली
.या घटनेचा पुढील तपास शहर ठाणे मलकापूर येथील पोलिस निरीक्षक विजय सिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली हे.का. एस.टि. महाजन करीत आहे.
