येनस प्रदिप रघुते
नवनियुक्त ठाणेदार विशाल पोळकर यांनी केले राष्ट्रीय ध्वजवंदन
संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या थाटात साजरा होणारा महाराष्ट्राचा स्थापना दिवस 'महाराष्ट्र दिन' मंगरूळ चवाळा येथील पोलिस स्टेशन च्या वतिने ठाणेदार विशाल पोळकर यांनी राष्ट्रीय ध्वज फडकवून सर्व पोलिस कर्मचाऱ्यांसमवेत महाराष्ट्र दिन साजरा केला. महाराष्ट्राला घडविण्यामध्ये संत, महापुरुष यांना व महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना स्मरण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. देशभरामध्ये महाराष्ट्र पोलिसांची छाप पडली आहे आणि प्रत्येक सण समारंभात, कायदा, सुव्यवस्था व शांतता अबाधित ठेवण्यासाठी ज्यांची महत्त्वाची भूमिका असते अशा पोलिस कर्मचाऱ्यांशिवाय महाराष्ट्र सुव्यस्थित राहू शकत नाही हे सत्य आहे. नव्यानेच रूजू झालेले सद्याचे पोलिस ठाणेदार विशाल पोळकर यांनी गावाला शिस्तबद्धता आणून परिवार उद्ध्वस्त करणाऱ्या बेकायदेशीर गोष्टींना कायद्याच्या भाषेत कारवाई केली आहे.
त्यामुळे महाराष्ट्र रोजच नव्याने घडतच असतो आणि घडविण्यामध्ये तसेच काही चुकीच्या गोष्टिंमुळे महाराष्ट्राची बदनामी करू पाहणाऱ्यांना चाप लावण्याचे महत्त्वाचे कार्य पोलिसांमार्फत होत असते. असे कार्य सतत होत राहण्यासाठी प्रामाणिक कार्य करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करण्याची अपेक्षा असते. जेणेकरून महाराष्ट्र घडविण्यामध्ये सर्वांचा हातभार लागू शकतो. महाराष्ट्र दिन साजरा करत असताना सर्वांनी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करावे तसेच कुठे काही चुकीचे घडत असल्यास पोलिस स्टेशन ला संपर्क करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
