अमरावती
नांदगाव खंडेश्वर येथील प्रसिद्ध पत्रकार पंजाबराव देशमुख स्पोर्टिंग क्लबचे सचिव मनोज मानतकर याने शिवणी रसुलापूर येथील एका मुलीशी खोटं आश्वासन देऊन व स्पोर्टचे प्रमाणपत्र व इतर कागदपत्रे देण्याचे सांगून सदर मुलीला फुबगाव येथून एका लग्न समारंभातुन स्वतःच्या गाडीने अमरावती येथे नेऊन गाडीतच कोल्ड्रिंक्स मध्ये गुंगीचे औषध देऊन माझ्या लग्नाच्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या आणि सदर मुलगी सह्या करत नहोती म्हणून तिला जीवे मारण्याची धमकी दिली असे पोलिसांत झालेल्या तक्रारीत नमूद
आहे मुलीच्या तक्रारी वरून पोलिसांनी गंभीर गुन्हे दाखल केले आहे त्यात ३२८,३६६,४९४,५०१,५०६,३४ कलमा दाखल आहेत मात्र यात आरोपी मनोज मानतकर फरार असून पुढील तपास पोलीस करीत आहे मात्र पत्रकारांनी अशी फसवणूक करणे समाजातील नागरिकांनी कुणाचा आदर्श घ्यावा अशी चर्चा जोर धरत आहे विशेष बाब सदर आरोपीचे लग्न झालेले असून त्याला एक मुलगा सुद्धा आहे यापूर्वी सुद्धा मानतकर यांचे विरुद्ध फसवणुकीचे ४२० या सारखे अनेक गुन्हे दाखल आहे
