Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

वासवी माता जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा

Responsive Ad Here

प्रतिनिधी वसमत

   आज दिनांक 11 /5/2022 रोज बुधवारी येथील आर्य वैश्य समाज बांधवां तर्फे श्री वासवी माता कन्यका परमेश्वरी यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.या निमित्ताने सर्व आर्य वैश्य समाज बांधवां तर्फे श्रमदान, स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. आज सकाळी 8.00 वाजता शोभायात्रा काढण्यात आली. शहराच्या विविध भागातुन झेंडा चौक, मामा चौक, कारंजा चौक मार्गे पुढे डॉ. तांभाळे यांच्या दवाखान्या समोरच्या आर्य वैश्य समाजाच्या जागेवर कार्यक्रम स्थळी शोभायात्रा आल्यानंतर मुख्य कार्यक्रम संपन्न झाला. मुख्य कार्यक्रमा साठी प्रमुख पाहुणे म्हणून वसमतचे आमदार श्री राजु भैय्या नवघरे यांची उपस्थिती होती. तसेच व्यासपीठावर आर्य वैश्य समाजाचे नवनियुक्त अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत कोसलगे, उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर दलाल, सचिव श्री प्रा डॉ अनिल मुगुटकर, जेष्ठ नागरिक श्री श्याम सेठ डिगुळकर मागील कार्यकारिणीचे अध्यक्ष, सचिव व विशेष उपस्थिती येथील अँक्सिस बँकेचे व्यवस्थापक श्री निलेश वट्टमवार साहेब हे होते.



    सर्वप्रथम आमदार श्री राजु भैय्या नवघरे यांचे अध्यक्षांच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि वासवी मातेची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. या नंतर मा. आमदार श्री राजु भैय्या नवघरे यांनी वासवी मातेच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून सर्व आर्य वैश्य समाज बांधवांना वासवी माता जन्मोत्सव सोहळ्याच्या शुभेच्छा दिल्या. आर्य वैश्य समाज हा सचोटीने व्यापार करणारा समाज असुन शहरातील प्रगतीशील समाज असल्याचे तसेच समाजातील अडचणी सोडविण्यासाठी सदैव आपल्या पाठीशी उभे असल्याचे सांगितले. वासवी माता कन्यका परमेश्वरी यांची महती वाढत असुन पेनुगोंडा या तिर्थक्षेत्र लवकरच पर्यटन स्थळ म्हणून विकसित होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
  यावेळी प्रा डॉ अनिल मुगुटकर लिखीत श्री वासवी माता कन्यका परमेश्वरी यांच्या जीवनकार्यावर माहितीपर लेख प्रकाशित झालेल्या दैनिक गाववाला अंकाचे आमदार श्री राजु भैय्या नवघरे यांनी प्रकाशन करुन उपस्थितांना वाटप करण्यात आले. 
यावेळी आर्य वैश्य महिला युथ कार्यकारिणी तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर आरती करुन उपस्थित सर्व समाज बांधवांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.
या नंतर समाज बांधवां तर्फे शासकीय रुग्णालयात दाखल रुग्णांना फळे वाटप करण्यात आली.



  अशा प्रकारे आर्य वैश्य समाज बांधवां तर्फे आज विविध सामाजिक उपक्रमाद्वारे आणि उत्साहाने वासवी माता कन्यका परमेश्वरी यांच्या जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष श्री लक्ष्मीकांत कोसलगे, सचिव श्री प्रा डॉ अनिल मुगुटकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर दलाल यांनी भोजन व्यवस्था, श्री अनिल कोसलगे यांनी शोभायात्रा व्यवस्था, श्रीकांत मोटारवार यांनी प्रमुख पाहुणे निमंत्रण व्यवस्था चोख पार पाडली. तसेच या कार्यक्रमासाठी सुमीत दलाल, शशिकांत कोसलगे, सतीश कोटलवार, गिरीश डुब्बेवार, अर्थमवार, विनोद कोटलवार यांच्या सह आर्य वैश्य महिला युथ अध्यक्षा सौ. रूपा दलाल, समितीचे सर्व सदस्य, तसेच आर्य वैश्य समाजातील सर्व पुरुष व महिला सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मदत करून उत्कृष्ट नियोजन केले त्या बद्दल सर्व समाज बांधवांच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे.