Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

एरंडोल येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिव स्वराज्य दिवस साजरा

Responsive Ad Here

एरंडोल शहर प्रतिनिधी कविराज पाटील,

 दि, ६ जुन रोजी एरंडोल येथे ३४८ वा शिवराज्याभिषेक दिवस छत्रपति शिवाजी महाराज यांचा स्मारकाला पुष्पहार अर्पण करुन व शिव गर्जना देत उत्साहात करण्यात आला, शिव स्वराज्य दिनाचे प्रास्ताविक श्री अहिरराव सरांंनी केले, मा प्रा, मनोज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले, तसेच सुत्र संचालन राकेश पाटील सर यांनी केले.



    शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे स्वराज्य संकल्प शहाजी राजे भोसले व राजमाता जिजाऊ  यांच्या लोकशाही स्वरुपाचे  बहुजनांचे, गोरगरिबांचे, दिनदुबळ्यांचे, दलित आदिवासीचे  हक्काचे स्वराज्य निर्माण करुन सुखसमृद्धी चे दिवसाचे स्वप्न साकारण्याचा कार्य   राजे शिवरायांनी सत्यात उतरवुन  बहुजनांचे मानसिक  भावनिक  धार्मीक गुलामगिरीतून मुक्त करणारा सोहळा म्हणजे शिवराज्याभिषेक दिवस होता असे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले,, 

या कार्यक्रमा प्रसंगी प्रा, अहिराव सर, डॉ सुरेश पाटील, प्रा मनोज पाटील( पहेलवान ) आर डी पाटील, सुरेश दाभाडे, मोहन चव्हाण, डॉ उमेश  पाटील, विजय पाटील सर, भाईदास पाटील सर, नाना पाटील, सत्यशोधक  शिवदास महाजन, संतोष पाटील, सुरेश पाटील, संभाजी आबा देसले ,डि एस पाटील सर  कार्यक्रमाला उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वितोसाठी   राकेश पाटील सर, कविराज पाटील, हेमंत पाटील, योगेश पाटील , स्वप्नील सावंत , अजय पाटील पंकज पाटील  यांनी योग्यरित्या नियोजन केले,