Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

महावितरण कंपनीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे धरणे आंदोलन

Responsive Ad Here



नांदुरा प्रतिनिधी 

नांदुरा शहरातील हेलगे नगर येथे नवीन डीपी बसविणे व शासनाने केलेली विज बिल विद्युत वाढ रद्द करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मोहनराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली नांदुरा तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे उपविभागीय अभियंता महावितरण कंपनी नांदुरा यांनी उपोषणाला भेट देऊन यांनी सांगितले की, डी. पी. डी. सी मधून हेलगे नगर करिता डी. पी मंजूर आहे. परंतु निधी उपलब्ध झाला नाही. 

  हेलगे नगर नवीन वस्ती असल्यामुळे नवीन घरे मोठ्या प्रमाणावर तयार झाली आहेत. अनेक लोक मिटर घेण्याचा प्रतीक्षेत आहेत. परंतु आज रोजी चालू असलेली डी. पी ओवर लोड असल्यामुळे नवीन कनेक्शन देणे बंद आहे. यावेळी पुरुषोत्तम साबे, बशीर काका, विशाल दांडगे ग्रा. प. सदस्य हेलगे नगर प्रवीण बहुरूपे, विशाल भाकरे, निवृत्ती इंगळे, रवींद्र डिवरे, • गुलाबराव देशमुख, नाना खोदरे, विष्णू लाहुडकार, अमोल बाठे, संजय पांडव, रुपेश रहाने, सदाशिव मारोडे, ईश्वर इंगळे, प्रदीप दांडगे, गणेश दांडगे, ज्ञानेश्वर पाटील, सतीश कुयटे, प्रसाद कुटे, हे उपस्थित होते.