प्रदिप रघुते येनस
1) जेव्हा एखादा दबदबा असलेला माणूस तुमच्या अधिकाराचे उल्लंघन करतो तेव्हा तुम्हाला पत्रकाराचीच आठवण येते 2) जेव्हा तुम्हाला प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांकडून त्रास दिला जातो, तेव्हा तुम्हाला पत्रकाराची आवश्यकता असते. 3) जेव्हा एखादा लेखापाल मुख्य अधिकारी व इतर कोणतीही उच्चपद व्यक्ती आपले हक्क काढून घेण्याचे प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला पत्रकार शोधण्याची घाई असते. 4) जेव्हा आपण एखादा राजकारणी अधिकारी ख्यातनाम व्यक्ती पिडीत व्यक्ती यांच्या समवेत एखादा विशेष कार्यक्रम करतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते.
5) जेव्हा आपण समाजात असलेल्या वाईट गोष्टी दुर करण्यासाठी लढा उभारतो तेव्हा आपल्याला पत्रकाराची गरज भासते. 6) जेव्हा आपण आपल्या मुलांना शाळेत पाठवाल आणि तिथे एखादा शिक्षक किंवा इतर कोणत्याही मुलाने त्यांचा मानसिक छळ केला तर आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. 7) जेव्हा आपण शेती करता काही कारणास्तव आपल्या पिकांचे नुकसान होते व आपल्याला शासन दरबारी न्याय मिळत नाही, तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. 8) घरी बसून संपुर्ण जगात काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी पत्रकाराच आपल्या लेखणीतुन दाखवतो 9) जेव्हा आपल्याला पात्र असताना देखील कोणत्याही सरकारी योजनेचा किंवा घरकुलचा लाभ मिळत नसेल तेव्हा आपल्याला पत्रकाराची आवश्यकता असते. 10) जेव्हा एखादी घटना - दुर्घटना घडते तेव्हा पत्रकाराची आठवण येते.
वरील प्रश्नांची उत्तरे स्वतः ला द्या आणि मग पत्रकारांबद्दल आपले मत बनवा. हे सर्व करत असतांनाच पत्रकार हा बदनाम होतो.आम्ही हे नाही म्हणत सर्व चांगले आहेत, परंतु सर्व पत्रकार वाईट सुद्धा नाहीत. पत्रकार दिवस-रात्र उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूत सर्व सामान्यांना न्याय मिळावा म्हणून हक्कासाठी लढत असतो.
इतके सारे करुण सुध्दा खोटे गुन्हे दाखल करुण पत्रकार यांना जिवे मारण्या धमक्या किंवा खोटे आरोप करुण गुन्ह्यात अडकीविने हे सर्व कोण करतो आपणच यांचा विचार जर केला तर खरोखर नक्की पत्रकारावरील आरोप हे नक्की थाबतील..यात सर्वात मुद्दा असा आहे.ज्याची चांगली बातमी प्रकाशित केली तर पत्रकार साहेब चांगलं काम केलं..पण एखाद्या व्यक्तीच्या विरोधात जर बातमी प्रकाशित केली तर त्याचा विरोध करणे सुरु होतो..म्हणुन हे होत असलेले खोटे आरोप पत्रकारावरच का..या कडे सुध्दा थोडं तरी अधिकारी किंवा लोक प्रतिनिधी तसेच आमचे काही काळीखोर पत्रकार यांनी सुध्दा संघटना कोणतीही असो..पत्रकार हा शेवटी माझा आहे असे समजुन त्या पत्रकारांच्या जिवनाशी खेळु नये..
