Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शाळेमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळ्याचे आयोजन

Responsive Ad Here
मलकापूर प्रतिनिधी
    
    स्कूल ऑफ स्कॉलर्स मलकापूर ( सी.बी.एस.सी.) येथे 10 जुलै रोजी आषाढी एकादशीनिमित्त दिंडी सोहळ्याच्या आयोजन करण्यात आले होते. या दिंडीमध्ये महाराष्ट्राचे कुलदैवत विठू माऊलीचे व रुक्मिणी माता यांची वेशभूषा करून मुलांना भेट दिली. तसेच पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, दिंडी सोहळ्यात शाळेतील नर्सरी, केजी तसेच इयत्ता पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची पारंपारिक वेश परिधान करून दिंडी सोहळ्याची शोभा वाढवली.


     हा सर्व चैतन्यमय सोहळा अध्यात्मिक वातावरणात पार पडला. या सोहळ्यानिमित्त शाळेच्या मुख्याध्यापिका सुदीप्ता सरकार यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले. तसेच शाळेतील शिक्षक सचिन नावकर यांनी देखील आषाढी एकादशी सोहळ्याचे आध्यात्मिक महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. हा सर्व सोहळा यशस्वीरित्या घडवून आणण्यासाठी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले