हिवरखेड प्रतिनिधि : जितेश कारीया
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिक्षेत्र महाविद्यालयातून अंतिम वर्ष एम.बी.बी.एस. भाग एक हिवाळी 2020 च्या ई.एन.टी.(कान,नाक,घसा) या विषयात सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण झाल्यामुळे रेनुश्री अशोक राऊत हिचे चंद्रकांत देसाई इंडोमेन्ट प्राइस ऑफ ऐ. ओ.आय.पारितोषिक मानकरी ठरल्यामुळे त्यांना सन्मानित करण्यात आले.पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम दिनांक 4 जुलै 2022 रोजी डॉक्टर पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल अमरावती महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
यावेळी रेनुश्री या पारितोषिक, सन्मानाचे श्रेय तिला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे डिन व सर्व प्राध्यापक वर्ग डॉ पंजाबराव देशमुख मेमोरियल मेडिकल महाविद्यालय आणि त्यांची मोठी बहिन डॉक्टर अनुश्री अशोक राऊत यांना देत आहे
