मलकापूर प्रतिनिधी
मलकापूर तालुक्यातील भालेगाव येथील ४२ वर्षीय इसम बेपत्ता झाल्याची नोंद मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.भालेगाव येथील विक्रमसिंग प्रतापसिंग इंगळे हे कोणाला काही न सांगता निघून गेले.
त्यांचा मित्र व नातेवाईकाकडे शोध घेतला परंतु कुठेही आढळून आले नाही .नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून बेपत्ता झाल्याची नोंद मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला करण्यात आली असल्याची माहिती १२ जुलै रोजी देण्यात आली आहे.
