Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

न्यू मिलेनियम शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

Responsive Ad Here

हिवरखेड प्रतिनिधी जितेश कारीया 

    जुनी सांगवी :- येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचालित द न्यू मिलेनियम शाळेत दहावी व बारावीत गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आलाद न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कुल व ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून अश्विनी लक्ष्मण जगताप, अमोल उंद्रे, शंकर जगताप उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने दीपप्रज्वलन करून सोहळ्याला सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूजा चौधरी यांनी केले.

     तर संचालन नीता देशमुख यांनी केले  यावर्षी कोरोना सारखे महासंकट ओढवले असतांना अनेक समस्यांना सामोरे जाऊन दहावी व बारावीचे विदयार्थी परीक्षेला बसून घवघवीत यश संपादन केल्या बद्दल त्यांचे कौतुक करून शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे सचिव शंकर जगताप यांनी विद्यार्थी घडला तरच सुशिक्षित समाज व देश घडतो असे प्रतिपादन करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले यावेळी स्वाती पवार,प्राचार्य इनायत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले  समारंभाला संस्थेचे उपाध्यक्ष विजय जगताप,जयश्री माळी,देवराम पिंजण आदी उपस्तीती होते समारंभाच्या शेवटी आदर्श शिक्षिका नीता देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले.