लोणार : असलम परवेज
केंद्र व राज्य शासनाच्या वतीने आजादीचा अमृतमहोत्सव हा गौरवपूर्ण उपक्रम देशभरात राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने विविध उपक्रम व कार्यक्रमाचे आयोजन नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यास देशांमध्ये सुरुवात झाली आहे. त्याचाच भाग म्हणून मंगळवार दिनांक 9 ऑगस्ट 2022 रोजी लोणार नगरपरिषदच्या शाळेत सामूहिक राष्ट्रगीताचे आयोजन करण्यात आले. सकाळी 7ते 9 वाजे दरम्यान संपूर्ण 6 शाळांनी लोणार शहरात प्रभात फेरी काढली व विविध घोषवाक्य द्वारे शहरामध्ये आजादीचा अमृत महोत्सव या उपक्रमाची मशाल पेटवली. संपूर्ण शहरांमध्ये या प्रभातफेऱ्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. लहान चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या हातामध्ये तिरंगे झेंडे घेऊन व तीन रंगाचे फुगे बांधून विविध कर्तबे दाखविली.
सदर प्रभात फेऱ्या शहरातील नगरपालिकाची मोठी उर्दू पूर्व माध्यमिक डिजिटल शाळा येथे 10:30 वाजता पोहोचल्या. तेथे विद्यार्थ्यांना देशासाठी आपली बळी देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांच्या जीवनाबद्दल माहिती देण्यात आली. स्वातंत्र्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. त्यानंतर ठीक 11:00 वाजता सामूहिक राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. यामध्ये बहुसंख्य पालकांनीसुद्धा आपला सहभाग नोंदविला.
शाळेतील सामूहिक राष्ट्रगान कार्यक्रमामध्ये सतीश कापूरे, (प्रशासन अधिकारी), नितीन राऊत,विठ्ठल सावंत,पंजाबराव मापारी (मुख्याध्यापक), राहुल मोरे, संदीप जाधव, जयश्री कोळी,राजू वानखेडे,(मुख्याध्यापक),सुनील पुरी, सय्यद सोहेल (मुख्याध्यापक) शेख अब्दुल बरकत, शेख इस्माईल, (मुख्याध्यापक) शेख खलील, शेख शमशुद्दीन, अस्मा अंजुम, शेख सलीम, असलम परवेज, शहेनाज बेगम,आमेरअली सिद्दिकी, शेख जावेद, शेख कदीर (मुख्याध्यापक) शाहीन कौसर,आमेना परवीन सह, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष शेख सज्जाद शेख करामत व पालक वर्ग आणि सर्व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
