प्रतिनीधी मलकापूर संजय वानखेडे
खामगांव शेगांव रोडवर दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी 2:30 वाजता शेगांवहुन खामगांव येत असलेल्या एस टी बस क्रमांक MH 29 D 9271 च्या चालकाने निष्काळजीपणे ठाकूर फायबर्स टायर्स समोर रस्त्यावर बसलेल्या दोन जिवाच्या गायीला पाठी मागून जबर धडक देऊन पोबारा केला होता ही धडक एवढी जबर होती की गायीच्या पाठीवर गँभीर दुखापत होऊन खोल जखम झाली व ती जमिनीवर रक्तबंबाळ अवस्थेत तडफडत होती त्यावेळेस रस्त्याने येत असलेले पिपल फॉर ऍनिमल्स क्रुयल्टी केस ऑफिसर सुरजभैय्या यादव, व एकनिष्ठा गौ-सेवा फाउंडेशन अध्यक्ष त्यांचे सहकारी जितेंद्र गोयल, सिद्धेश्वर निर्मळ, पत्रकार गणेश भेरडे, यांनी लगेच डॉ निवृत्ती क्षिरसागर यांना बोलावून जखमी गायीला रस्त्याच्या बाजूला नेऊन ताबडतोब उपचार करून घेतले गायीवर उपचार करताच ती खूप घाबरलेली असून पळून गेली होती.
घटनेची माहिती सुरजभैय्या यादव व पि. एफ.ए.मेंबर एडव्होकेट संदीप पनपालिया यांनी शहर पोलिस स्टेशनला दिली व तसेच निष्काळजीपणे एस टी बसने धडक मारून पोबारा केलेल्या चालकावर शहर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल सुद्धा करायला लावला. दुसऱ्या दिवशी दिनांक 26 ऑगस्ट रोजी ती गाय दुपारी 12 वाजताच्या सुमारास सामान्य रुग्णालयातील पोलिस चौकी मागे जखमी अवस्थेत होती यावेळी डॉ राऊत यांना बोलावून उपचार करण्यात आले गौ-मालकाचा शोध घेतला असता जीवन सगट यांच्या मालकीची गाय त्यांच्या स्वाधीन करण्यात आली होती परंतु त्यांनी गायीला घरी नेण्यास नकार दिला असता त्या गायीला सामान्य रुग्णालय येथील एका खोली मध्ये रात्रभर सुखरूप ठेवून तिसऱ्या दिवशी दिनांक 27 ऑगस्टला सुरजभैय्या यांनी गौ-मालकाला बोलावून घाटपुरी येथील श्री गौरक्षण संस्थान मध्ये गायीला नेऊन दिले सध्या गायीवर उपचार सुरू आहे. या गौ-सेवेत गोलू ठाकूर, मोनिका किलोलिया, राजेश इंगळे, छोटु लकडे, गिरी मेजर, सफाई कर्मचारी आदि लोकांनी सहकार्य केले अशी माहिती जितेंद्र गोयल यांनी दिली.
