प्रतिनीधी मलकापूर संजय वानखेडे
रेल्वे रुळ ओलांडताना मालवाहू गाडीच्या धडकेत पंचेचाळीस वर्षीय अनोळखी इसम जागीच ठार; ओळख पटविण्याचे रेल्वे पोलीसांचे आवाहन मलकापुर:- मलकापुर स्टेशनाबाहेरील नळगंगा नदीपुलानजीक दि.29 ऑगस्ट रोजी अप मेन लाईन वर कि.मी.नं.493/31-33 जवळ अनोळखी पंचेचाळीस वर्षीय ईसम रेल्वे रुळ ओलांडताना मालवाहू गाडीने दिलेल्या धडकेत तो जागीच ठार झाला असुन पोलीस स्टेशन शेगांव अ. मृ. मध्ये रजि.नं. 27/2022 कलम 174 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला .
असुन मयताचे वर्णन पुढील प्रमाणे वय अंदाजे 45 वर्ष, उंची॒- 5 फूट 3 इंच,डोळे- काळे बारीक,चेहरा- लांबट,रंग- गोरा,नाक- सरळ,शरीर बांधा- सडपातळ,दाढी मिशी- वाढलेली काळी पांढरी अंगात नेसनीस- पांढरे फिकट निळ्या उभ्या लाईनींगचे फुल बाहिचे शर्ट व काळया रंगांची फुलं पॅन्ट घातलेले असून वरील वर्णनाच्या मयताचे वारसा बाबत किंवा नातेवाईकां बाबत काही एक उपयुक्त माहीती मिळाल्यास पो.ना. विजय कोल्हे, लोहमार्ग पोलीस स्टेशन शेगांव मो.नं 7249690659 यांचे शी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
