अपरेश तुपकरी प्रतिनिधी
सुमित पंडित यांचे समाज उपयोगी विविध ४२ उपक्रम राबवत तरुणांसाठि ठरलेत प्रेरनास्थान अत्याचार भ्रष्टाचार विरोधी अभियान औरंगाबाद यांच्या वतीने देन्यात येनारा समाजभूषण गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन मौलाना आझाद रीसर्च सेंटर औरंगाबाद येथे आयोजीत करन्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय मेत्रेवार साहेब.परिवहन अधिकारी औरंगाबाद,काशिनाथ चौधरी सर अधीष्टता घाटि, हे होते.समाजसेवक सुमित पंडित यांना समाजभूषण पुरस्कार व समाजसेवीका सौ.पुजा सुमित पंडित यांना महिला समाजरत्न गौरव पुरस्कार - २०२२ हा पुरस्कार काशिनाथ चौधरी सर अधीष्टता घाटि व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करन्यात आला.
यामध्ये राज्यस्तरीय सामाजिक,क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करनाऱ्या व्यक्तीच्या कार्याची दखल घेत पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार वितरीत करन्यात आले.समाजभूषण गौरव या पुरस्कारासाठी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करनाऱ्या औरंगाबाद येथील सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून कार्य करनाऱ्या माणुसकी समुहाचे अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित व माणुसकी वृध्दाश्रम संचालीका समाजसेविका सौ. पुजा पंडित यांच्या कार्याची दखल घेत महिला समाजरत्न गौरव पुरस्कार देन्यात आला आहे. ह्या पुरस्काराचे स्वरूप शाल श्रिफळ सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र वृक्ष देऊन उपस्थित माण्यवरांच्या गौरवण्यात आले.या समाजरत्न पुरस्कारामुळे समाजात समाजसेवक सुमित पंडित व पुजा पंडित त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.सुमित पंडित चा हा ८९ वा पुरस्कार आहे.या आधी त्यांना महाराष्ट्रातुन विविध ८८ पुरस्कारांनी या आधी सन्मानित करण्यात आले आहे.तसेच पुजा चा हा २३ वा पुरस्कार आहे या आधी पुजाला २२ पुरस्काराने सन्मानित करन्यात आले आहे.
अत्याचार भ्रष्टाचार विरोधी अभियानाचे संस्थेचे अध्यक्ष सय्यद साबेर,शफिक अहेमद, अब्दुल कय्युम,अनीस रामपुरे, प्रविन तांदडे,हसन शाह,आदिनी परीश्रम घेतले.सुत्र संचालन शेख मोबीन यांनी केले.माणुसकी समुहाचे अम्रपाली तायडे पोलीस निरिक्षक,जोतीताई गीरी,प्रा.शरद सोनवणे,सुमित पंडित सौ पुजा पंडित,लक्ष्मी पंडित,राम पंडित,आदि उपस्थित होते. या पुरस्कारामुळे समाजसेवक सुमित पंडित व समाजसेवीका पुजा पंडित यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
