प्रतींनिधी संजय वानखेडे
मलकापूर -: नगर सेवा समिती द्वारा संचालित ली.भो.चांडक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील वर्ग १० व १२ वी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दिनांक २५/०८/२२ रोज गुरुवारला दुपारी ४ वाजता प.पू.डॉ. हेडगेवार सभागृहात मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर सेवा समिती चे उपाध्यक्ष मा.श्री. भाऊसाहेब डोरले होते तर प्रमुख अतिथी मा. श्री. प्रकाशजी मुकुंद साहेब शिक्षणाधिकारी जि. प. बुलडाणा हे लाभले होते.
तसेच व्यासपीठावर नगर सेवा समिती चे कार्यवाह मा.श्री. दामोदरजी लखानी आणि नगर सेवा समिती चे सहकार्यवाह मा.श्री. माधवरावजी गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून सरस्वती पूजनाने प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर व्यासपीठावरील प्रमुख मान्यवरांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयातील गीतमंचच्या विद्यार्थ्यांनी सरस्वती - स्तवन सादर केले. यावेळी बुलडाणा जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी मा.श्री. प्रकाशजी मुकुंद यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मा.श्री. प्रकाशजी मुकुंद म्हणाले, "सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असून तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र आहे, याचा विद्यार्थ्यांनी योग्य वापर करणे काळाची गरज आहे." तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत आरोग्य संपन्न राहण्यासाठी खेळांकडेही लक्ष केंद्रित करावे. व गौरी सोळंके हिने राष्ट्रकुल स्पर्धेत यश संपादन करून विदर्भाचे नाव उंचावले असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप करताना मा. श्री. भाऊसाहेब डोरले यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यश प्राप्त करण्यासाठी ( STUDENT ) या शब्दाची सप्तसुत्री समजावून सांगितली. याप्रसंगी राष्ट्रकुल स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या कू. गौरी सोळंके हिच्या आई वडिलांचा संस्थेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
तसेच एस.एस.सी. व एच.एस.सी परीक्षेत गुणवंत असलेल्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीने ठेवलेल्या ठेवीतून बक्षिसांचे वितरण मान्यवरांच्या व प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ. आश्विनी कुळकर्णी व प्रा.श्री. फासे सर व श्री. नितीन चव्हाण सर यांनी केले. तर आभार प्रदर्शन विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री. जयंतराव राजूरकर सर यांनी केले. सामूहिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली..
