Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

गुरुद्वाराचे उद्घाटन प्रसंगी कोणतीही कमतरता भासू देणार नाही --माजी आमदार चैनसुख संचेती

Responsive Ad Here



मलकापूर 28/8/22 येथील सालीपुरा जवळ भव्य दिव्य गुरुद्वाराचे काम पूर्णत्वात आले असून  सदर गुरुद्वाराचे उद्घाटन येत्या 23 नोव्हेंबरला होणार आहे या उद्घाटन प्रसंगी संपूर्ण  भारतातून  येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना कोणतीही कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही माजी आमदार चैनसुख संचेती यांनी गुरुद्वारा येथे घेण्यात आलेल्या बैठकीदरम्यान अध्यक्ष स्थानावरून बोलताना दिली आहे.

यावेळी सदर बैठकीला उपस्थित उपविभागीय अधिकारी मनोज देशमुख, नगर परिषदेचे मुख्य प्रशासक तहसीलदार राजेंद्र सुरळकर, आगार व्यवस्थापक दराडे, समतेच निळ वादळ सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक अशांत भाई वानखेडे, रमेशसिंह दादा राजपूत, पोलीस अधिकारी भोरकडे , नगरसेवक राजू पाटील, संजय काजळे, राजदेव, राजपाल, मोहन शर्मा, विजय डागा, दामोदर शर्मा, तर दिल्ली येथून बाबा सुरेंद्र सिंग जी गुरुद्वारा बांगलासाहेब दिल्ली, बाबा रवींद्र सिंगजी गुरुद्वारा, बाबा यादवेंद्र सिंगजी गुरुद्वारा सिक्कीम, बाबा बांगदेव सिंहजी गुरुद्वारा पंजाब यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर गुरुद्वाराचे उद्घाटन पंजाबचे मुख्यमंत्री भगवान सिंग मान यांच्या हस्ते होणार आहे.
 सदर कार्यक्रमांमध्ये कोणतीही कमतरता भासू देणार नसण्याचे यावेळी संचेती यांनी सांगितले यावेळी आपले विचार व्यक्त करताना न.प. नगरसेवक अशांतभाई वानखेडे  म्हणाले की  नगरपरिषदेचे अधिकारी वर्ग सोबत घेऊन रस्ता ,लाईट ,पाण्याची कामे पूर्ण करण्याचे प्रयत्न करून आगंतुक पाव्हण्यांना लागणाऱ्या मुलभुत सुविधा पुरवली जावी याबाबतीत सर्व खबरदारी स्थानिक रहिवासीयांना घ्यावी लागणार आहे.तसेच माता महाकालीनगर,गुरूनानकनगर,भिमनगर,मंगलगेट,रमाईनगर,ग्रामीण पोलिस स्टेशन ते श्री कदमसर गुरूद्वारापर्यंत च्या रस्त्यास "श्री कदमसर गुरूद्वारामार्ग" असे नाव देण्यात येऊन ठिक ठिकाणी  दिशादर्शक नामफलक लावण्याची काळजी घ्यावी लागेल व सदर रस्ता दुरूस्ती तातडीने करण्यासाठी आपण रस्त्याच्या दुतर्फा पेवर्सब्लॉक बसवून माता महाकालीनगर प्रवेश द्वारापासून महादेव मंदिर भिमनगर पर्यंत पेवर्सब्लॉक बसवण्याचे कामा सुरूवात करण्यात आल्याचे प्रतिपादन अशांतभाई वानखेडे यांनी बोलतांना केले.यावेळी मान्यवरांचे यथोचित भाषणे झाली यावेळी सामाजिक राजकीय गावातील प्रतिष्ठित मान्यवर, पत्रकार, नागरिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.