मलकापूर संजय वानखेडे प्रतीनिधि
दि.२९ ऑगस्ट येथील मलकापूर शिक्षण समिती द्वारा संचलीत गोविंद विष्णू महाजन विद्यालय येथे राष्ट्रीय क्रीडा दिन व मेजर ध्यानचंद जयंती निमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. हाॅकिचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन करून सुरू झालेल्या या क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थीनिंनी उत्सफुर्त सहभाग घेतला. यात रस्सीखेच, गोळाफेक, रनिंग, औलांब उडी, लगोरी आदी क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालयात शैक्षणिक उपक्रमांसोबतच अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धा वेळोवेळी आयोजित करण्यात येत असल्याचे प्राचार्य एम पी कुयटे यांनी सांगितले. या स्पर्धेच्या आयोजनात सर्व शिक्षक बंधू-भगिनिंनी सभेसाठी तथा कर्मचार्यांचे योगदान राहिले.
