Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

संयुक्त सक्रिय क्षयरुग्ण व कुष्ठरुग्ण शोध मोहिमेस जामनेर तालुक्यात सुरुवात

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

    जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.तुषार देशमुख व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.इरफान तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली १३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीतील संयुक्त क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहिमेला जामनेर तालुक्यात  सुरुवात करण्यात आली.  आशा स्वयंसेविका व एक स्वयंसेवक प्रत्येक घरी जाऊन घरातील सर्व सदस्यांची तपासणी करीत आहेत. या मोहिमेत संशयित रुग्ण आढळून आल्यास त्यांचा छातीचा एक्स रे,थुंकी तपासणी व इतर आवश्यक तपासणी मोफत करण्यात येतील व निदान झाल्यावर मोफत उपचार करण्यात येणार आहे. यासाठी शहरी भागात ४ व ग्रामीण भागात २४८अशा एकूण २५२ टीम नेमण्यात आल्या असून त्यांचे यासंबंधी प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. पर्यवेक्षण करण्यासाठी ५० आरोग्य पर्यवेक्षक यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.शहरी भागातील ७०२६ व ग्रामीण भागातील ३१८७० अशा एकूण ३८८९६ नागरिकांची तपासणी या मोहिमेत करण्यात येणार आहे. या मोहिमेत कुटुंबातील सर्व सदस्यांना कुष्ठरोग व क्षयरोग आजाराची माहिती देऊन तपासणी करण्यात येणार आहे.



फिकट लालसर, न दुखणारा,  न खाजणार,बधिर चट्टा किंवा दोन आठवळ्यापेक्षा अधिक काळ खोकला, सायंकाळी वाढणारा ताप, वजन कमी होणे,रात्री येणारा तापासोबत घाम,थुंकीवाटे रक्त पडणे,सतत छातीत दुखणे,मानेजवळ लसीका ग्रंथींना सूज व इतर लक्षणे असल्यास नागरिकांनी सर्वेक्षणाच्या वेळी उपस्तीत राहावे. असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेश सोनवणे,डॉ.पल्लवी राऊत,डॉ.राजेश जैन,डॉ.मनोज पाटील,डॉ.दानिश खान,डॉ.संदीप कुमावत, डॉ.संदीप पाटील,डॉ.मोहितकुमार जोहरे यांच्याकडून नागरिकांना करण्यात करण्यात आले.मोहिमेसाठी कुष्ठरोग तंत्रद्य ई. पी.भोकरे व क्षयरोग विभागाचे सुयोग महाजन व सलील पटेल परिश्रम घेत आहे.