आज दि.18 सप्टेंबर 2022 रोज रविवार ला सालाबादप्रमाणे येणारी श्री.संत सखाराम महाराज दींडी सोहळ्याचे औचीत्य साधुन मा.आमदार राजुभाऊ एकडे यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून बांधण्यात आलेल्या सभागृहाचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला .
सदर कार्यक्रमांच्या अध्यक्ष स्थानी .ह.भ.प.विश्वंभर महाराज. श्री संत सखाराम ओमहाराज संस्थान चावरा ईलोरा हे होते.तर उद्घाटक मा आमदार राजुभाऊ एकडे साहेब हे होत यावेळी हनुमान धर्माळ संस्थान पंच बेलाड चे ऊपाध्यक्ष वामनराव संबारे, सदस्य माणिकराव पाटील, बुलडाणा जिल्हा कांग्रेस चे उपाध्यक्ष मनोजभाऊ देशमुख , मलकापूर तालुका कांग्रेस चे अध्यक्ष बंडुभाऊ चौधरी, मलकापूर शहर कांग्रेस चेअध्यक्ष राजुभाऊ पाटील, काँग्रेसचे युवा नेते प्रविण पाटील,मलकापुर तालुका राष्ट्रवादी कांग्रेस चे अध्यक्ष ज्ञानदेव ढगे,बेलाड ग्रामपंचायत चे नवनिर्वाचित सरपंच सचिन संतोषराव संबारे, उपसरपंच पती विनोद इंगळे,व ग्रा.प.चे सर्व सदष्य हनुमान धर्माळ संस्थान पंच बेलाड चे सर्व पदाधिकारी व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.