प्रतिनिधी
मलकापूर शहराला लागूनच असलेल्या व लोकसंख्येने मोठ्या असणाऱ्या मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या विविध रस्ते व नगरांसाठी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहे. मलकापूर शहराला लागून असलेल्या परिसरामध्ये दिवसेंदिवस लोकवस्तीचे प्रमाण वाढत असल्याने विविध काॅलनी,नगरे उदयास येत आहेत. यामुळे आता बाहेरील गावातील तसेच मलकापूर परिसरातील व ग्रामीण भागातील मलकापूर शहरात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहे.
