मलकापूर प्रतिनिधी
" तिर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी " असे सांगत दिन दुबळ्या अनाथ अपंगांची सेवा करणारे संत गाडगेबाबा यांनी समाजाला स्वच्छ चारित्र्याची शिकवण दिली. पन रोकडा घेऊन सत्ता स्थापन करणार्या राज्यातील नव्या सरकारला गाडगेबाबा यांची शिकवण समजली नाही म्हणुन मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर राज्यातील तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लावलेली संत गाडगेबाबा यांची दशसूत्री नव्या सरकारने हटवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे
संत गाडगेबाबा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर संत गाडगेबाबा यांचा दशसूत्री फलक लावला होता.
दशसूत्री काय आहे
तहानलेल्या पाणी द्या
वस्त्रहीन व्यक्तींना वस्त्र द्या
गरीब मुलांना शिक्षणात मदत करा,
प्रत्येक गरीबाला शिक्षण देण्यात योगदान द्या
बेघर असलेल्यांना आसरा द्या
अंध, विकलांग, आजारी व्यक्तींची मदत करा
बेरोजगारांना रोजगार द्या
पशू-पक्षी, मूक प्राण्यांना अभय द्या
गरीब, कमजोर लोकांच्या मुलांच्या लग्नात मदत करा
दुखी आणि निराश लोकांना हिमंत द्या
हाच खरा धर्म आहे आणि हीच खरी ईश्वरभक्ती
समस्त धोबी/परीट समाजातर्फे शिंदे व फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करण्यात येत असून संत गाडगेबाबा यांची दशसूत्री सन्मानपूर्वक मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात यावी अन्यथा महाराष्ट्रभर आंदोलन करू असा इशारा संत गाडगेबाबा प्रेमी आणि धोबी/ परीट समाजातर्फे करण्यात येत आहे.
