Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

शुभम पाटील यांची युवासेना जिल्हा प्रमुख पदी नियुक्ती

Responsive Ad Here

प्रतिनिधी

  आठ गावाचे कार्यक्षेत्र असलेल्या विविध कार्यकारी सोसायटी च्या निवडणुक मध्ये संभाजी ब्रिगेड चे जिल्हा अध्यक्ष श्री. योगेश पाटील यांच्या विजय झाल्या निमित्त श्री. योगेश पाटील व श्री. शुभम पाटील या दोन्ही नवनिर्वाचित सद्गृहस्थांचे शिवसेना व युवासेना मलकापूर तालुका व शहराच्या वतीने शासकीय विश्राम गृहात सत्कार कार्यक्रम संपन्न.

कार्यक्रमादरम्यान बुलडाणा  जिल्हाप्रमुख मा. श्री. वसंतरावजी भोजने यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन तसेच शिवसेना तालुका प्रमुख श्री. दिपक चांभारे पाटील व श्री. गजनानभाऊ ठोसर शिवसेना नेते यांच्या मार्गदर्शनाखाली शिवम ढोले, सागर भोजने, करण राजपूत, अभय कोलते, ऋत्विक पाटील, अभिषेक नारखेडे, अजय इंगळे, योगेश बावस्कार, मयुर ताटर, किशोर राऊत, अतूल तांदूळे, निलेश ढोले, क्रिष्णा सनिसे, आकाश हांडगे, सुपडा पाटील, गणेश तारापुरे, वैभव सोनोने, प्रविण भारंबे, भुषण ढोले, अभिषेक ढोले, यश राजपुत, मयूर कोलते, नासिर खान, सूशिर ठाकरे, आकाश बोरसे, अभिषेक ढोले, अतूल गोसावी, अक्षय गंतीरे, सुपडा पाटील, दुर्गेश सनिसे, मुश्ताक पठाण व ईतर बांधवांचा शिवसेना-युवासेना यात जाहीर प्रवेश करण्यात आला. तसेच युवा सेना कार्यकारिणी घोषित करण्यात आली. मलकापुर युवा सेनेच्या तालुकाप्रमुख पदी गणेश सुशीर, युवा सेनेच्या शहर प्रमुख पदी पवन गरुड, उपशहरप्रमुख पदी आकाश बोरले व शे. यासीन, सचिव पदी मुस्ताक खान पठाण यांची नियुक्ती करण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान श्री. रवींद्र (सोनू) भोजने जिल्हा उपप्रमुख युवा सेना यांनी येनाऱ्या शिवसेना दसरा मेळावा शिवाजी पार्क, मुंबई येथे प्रचंड संख्येने उपस्तीत राहण्याचे आव्हान केले. 

त्यावेळी एस. पी. सांबारे सर जिल्हा कोषाध्यक्ष संभाजी ब्रिगेड, बाळूभाऊ कुयटे खामखेड शाखा प्रमुख, शिवाजीराव घोराडे आळंद शाखा प्रमुख, पवन वाघ, अर्जुनराव कुयटे, रमेश तांगडे, रामराव तळेकर, बाळूभाऊ पोळखरे, पांडुरंग चीम, समादभाई कुरेशी, इमाम शहा, सै. वसिम, तसलीम शेख, युनिस कुरेशी, महादेवभाऊ, दिपक कोथळकर व ईतर शिवसैनिक हजर होते.