Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

धनगर समाजाला आरक्षणाची अंमलबजावणी जामनेर येथे बैठक

Responsive Ad Here

 

जामनेर प्रतिनिधी

जामनेर तालुका धनगर समाज संघर्ष समिती तालुक्याच्या बैठकीत धनगर समाज संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्यसभेचे माजी खासदार पद्मश्री डॉक्टर विकास ची महात्मे यांनी या बैठकीत सहा नोव्हेंबर 2022 रोजी संभाजीनगर येथे सकल धनगर समाज मेळावा आयोजित केला आहे या मेळाव्याच्या संदर्भात आज जामनेर तालुका सकल धनगर समाज बांधवांची बैठक घेऊन मेळाव्या संदर्भात सविस्तर माहिती दिली या बैठकीत बोलताना सांगितले की सहा नोव्हेंबर 2022 रोजी संभाजीनगर येथे सकल धनगर समाज मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यामध्ये धनगर समाजाला आरक्षण अंमलबजावणीसाठी तसेच शासकीय निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा शासनाकडून व्हावा यासाठी धनगर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी जामनेर तालुक्यातील व जिल्ह्यातील सकल धनगर समाज बांधवांनी गट तट पक्षभेद न करता सर्व समाज बांधवांनी संभाजीनगर येथे होणाऱ्या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान याप्रसंगी डॉक्टर विकास महात्मे यांनी केले.



जामनेर तालुक्यातील पहुर येथे गजानन दूध उत्पादक संस्थांच्या सभागृहात जामनेर तालुका धनगर समाज बांधवांची बैठकीत बोलताना सांगितलेजामनेर तालुका दौऱ्यावर डॉक्टर विकास महात्मे आले असता त्यांचे पहुर येथे समाज बांधवांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.येथील अहिल्यादेवी होळकर नगरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळ्याचे पूजन डॉक्टर विकास महात्मे यांच्या हस्ते करून त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी आदर्श गणेश मंडळ गणेशोत्सवानिमित्त येथील परिसरात डॉक्टर विकास महात्मे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले

याप्रसंगी माजी जि प सदस्य राजधर पांढरे सहकार महर्षी भास्कर पाटील धनगर समाज उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य संदीप सावळे लोकनियुक्त सरपंच नीता पाटील जय मल्हार दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन कालींदाताई घोलप पत्रकार गणेश पांढरे आर टी लेले महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आर बी पाटील विकास सोसायटीचे संचालक अरुण घोलप बाबुराव आस्कर शरद पांढरे राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्र प्रमुख शैलेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते किरण पाटील ग्रामपंचायत सदस्य भारत पाटील संदीप बेढे सुनील घोलप गणेश मंडलिक प्रदीप बेढे ईश्वर देशमुख बंडू पाटील भारत पाटील रवी देशमुख गोपाल पाटील यांच्यासह सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता