संजय वानखेडे प्रतिनिधी मलकापूर
केंद्र शासणा तर्फे देण्यात येणार्या सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योगा करिता असणार्या एमएसएमई योजनांची जनसामान्यांपर्यंत माहिती व्हावी व त्याचा जास्तीत जास्त नागरिकांना उपभोग घेता यावा अश्या उदत्त हेतूने एमएसएमई मंत्रालय, भारत सरकार व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, तसेच इंडस्ट्री अँड अग्रिकल्चर यांच्या संयुक्त विद्यमानाने केंद्रीय मंत्री श्री नारायणजी राणे ह्यांच्या मार्गदर्शनात व चेंबर चें अध्यक्ष श्री ललितजी गांधी ह्यांच्या नेतृत्वात देशभर उद्योग वृद्दी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये संपूर्ण विदर्भाची (अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वाशीम, अमरावती ) जवाबदारी मलकापुर येथील भाजपा जैन प्रकोष्ट महाराष्ट्र प्रदेश सहसचिव व चेंबर च्या शैक्षणिक समिती प्रदेश सदस्य डॉ. योगेश पटनी व अकोला चें श्री शीतलजी जैन यांच्या वर देण्यात आलेली असून आपल्या भागातील जास्तीत जास्त संखेने या योजनांचा लाभ जनसामान्यांपर्यंत पोचविण्यात येणार असलाची माहिती त्यांनी दिली.
देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी तसेच तरुण वर्गाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी नवीन उद्योगांना चालना मिळावी या करिता केंद्र शासनातर्फे सूक्ष्म,लघु व मध्यम उद्योगा करिता असणार्या एमएसएमई योजनां लागू करण्यात आल्या आहेत. मात्र या योजनांची स्थानिक पातळीवर जनसामान्यांना परिपूर्ण माहिती नसते व त्यामुळे या योजनांचा उपयोग होत नाही. या योजनांची परिपूर्ण अशी माहिती जनसामान्यांपर्यंत पोचवून जास्तीत जास्त लोकांना फायदा कसा घेता येईल त्या साठी एमएसएमई मंत्रालय, भारत सरकार व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, तसेच इंडस्ट्री अँड अग्रिकल्चर यांच्या संयुक्त विद्यमानाने १७ सप्टेंबर ते २२ नोव्हेंबर या कालावधी दरम्यान महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये चेंबर च्या युवा विंग चें प्रदेश अध्यक्ष श्री संदिपदादा भंडारी ह्यांच्या नेतृत्वात उद्योग वृद्दी मेळावे आयोजित करण्यात आले आहे.
हे मेळावे आपल्या विदर्भ विभागात अकोला,अमरावती,बुलढाणा, यवतमाळ , वाशिम अश्या ५ जिल्ह्यांमध्ये होणार आहेत. व या बद्दल ची संपूर्ण जवाबदारी ही भाजपा जैन प्रकोष्ट महाराष्ट्र प्रदेश सहसचिव डॉ. योगेश पटनी यांच्या कडे देण्यात आलेली असून आपल्या भागात जास्तीत जास्त प्रसार करून त्याचे उपयोग जास्तीत जास्त प्रमाणात करून देण्या बाबत ची माहिती त्यांनी दिली.

