जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील अंतर्गत पहुर पेठ ग्रुप ग्रामपंचायत समोर सांगवी गावातील राहत्या घराच्या बाजूला असलेल्या उकिरडा हटवण्याच्या मागणीसाठी 18 ऑक्टोंबर रोजी ग्रामपंचायत समोर आमरण उपोषण चा कडक इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे.आज सकाळी सांगली येथील आजमुद्दीन तडवी यांनी पहुरपेठ ग्रुप ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की माझ्या घराला लागून जेसीबी साह्याने दोन मोठे खड्डे खोदून तेथे उकिरडा टाकल्यामुळे दास दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे आम्हाला घातक आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या कारणास्तव मी ग्रुप ग्रामपंचायत पहुर पेठ पंचायत समिती जामनेर जिल्हा परिषद जळगाव पोलीस ठाणे असे वारंवार अर्ज सादर करून त्याची आजपर्यंत काही चौकशी झालेली नाही त्याकरता मी ग्रुप ग्रामपंचायत पहूर पेठ समोर माझ्या कुटुंबासह 18 ऑक्टोंबर 2022 वार मंगळवार रोजी बेमुदत उपोषणाला बसणार आहे
अन्याय विरुद्ध मला न्याय मिळावा याकरता माझ्या कुटुंबासहित ग्रामपंचायत सोबत लोकशाही मार्गाने बेमुदत उपोषण साठी बसणार असल्याचे निवेदनात सांगितला आहे
.jpeg)