Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पोलीस निरीक्षक किरण बकाले यांना सेवेतून बडतर्फे करून अटक करा

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक किरण बकाले यांनी मराठा समाजाच्या विरोधात अत्यंत गलिच्छ व घाणेरडे वक्तव्य करून मराठा समाजाची बदनामी केल्याने संपूर्ण मराठा समाजाच्या भावना दुखावल्या आहेत किरण बकाले ला सेवेतून बंड तर्फे करून अटक करण्यात यावी या मागणीसाठी जामनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने येथील पोलीस ठाणे समोर साखळी आंदोलन करण्यात आले यावेळी सकल मराठा समाज मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड बहुजन क्रांती मोर्चा प्रहार संघटना आदींसह इतर पक्ष पदाधिकारी व विविध संघटनेचे कार्यकर्ते यांनी पाठिंबा दर्शविला आहे

जामनेरात सकल मराठा समाजाचे साखळी आंदोलन

या साखळी आंदोलनात माझी जि प सदस्य संजय गरुड राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विलास राजपूत युवा सेना उपजिल्हाधिकारी विश्वजीत पाटील पत्रकार गणेश पांढरे राजू खरे राम अपार हि पी पाटील डी एन चौधरी जितेंद्र पाटील आबासाहेब पाटील सुनील कांनडजे जीवन पाटील प्रदीप गायके मनोज महाले युवराज बिजागरे राहुल चव्हाण दशरथ पाटील नाना पाटील प्रवीण गावंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते मराठा समाजात सर्व समाजा सोबत घेऊन चालणारा समाज आहे वर्षानुवर्ष मराठा समाजाने संपूर्ण महाराष्ट्राचा गाव गाडा हाकलेला आहे देशाच्या राष्ट्राच्या जडणघडणीत ‌ मध्ये मराठा समाजाचे खूप मोठे योगदान आहे या मराठा समाजाच्या विरोधात जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेचे निलंबित पोलीस निरीक्षक किरण बकाले यांनी अत्यंत खालच्या दर्जाचे वक्तव्य करून समाजाच्या महिलांचे बदनामी केलेली आहे या प्रकरणी तात्काळ किरण बकाले याला बड तर्फे करून अटक करण्यात यावी या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने संपूर्ण राज्यात  स्वरूपाचे आंदोलन करण्यात आले आहे