राहुल संबारे बेलाड
हिवरा आश्रम येथील महाविद्यालयात शिकत असलेल्या कृषी कन्या कु. शैला संबारे, प्रतीक्षा घोडे, अंजली पाटील, पुनम छळकर, अंकिता भगत, प्रिया तायडे, प्रगती गाळकर, कल्याणी निकाळजे विवेकानंद कृषी महाविद्यालयातील कृषी कन्या यांनी राबवलेल्या कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत पोखरी या गावात बियाण्यांचे विविध प्रकार तसेच त्यांची उगम क्षमता व बीज निवडताना त्या संबंधित घ्यावयाची काळजी याचे प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली..
यांनी अतिशय साध्या व सोप्या पद्धतीने प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांनी सर्वप्रथम बियाणांची चाळणी करून घ्यावी व त्यातील काळी कचरा बाजूला करावा. त्यानंतर बियाण्याला ओला टॉवेल पेपर किंवा गोणपाट यामध्ये हरभरा किंवा इतर बियाण्याचे 100 दाणे घेऊन एका ओळीत दहा अशा पद्धतीने दहा ओळींची मांडणी करावी. पेपर ओला राहण्यासाठी हलक्या प्रमाणात चार ते पाच दिवस त्यावर पाणी शिंपडत रहावे, तसेच सात ते आठ दिवसानंतर बिजांकुर झालेला बियांची संख्या मोजावी जितक्या बियांना अंकुर फुटले असतील तितकी बियांची उगवण क्षमता समजाववी .
