जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील भराडी येथील तरुणांनी शिवसेना सहसंपर्क प्रमुख डॉ.मनोहर पाटील यांच्या हस्त शिवसेना पक्षप्रवेश सोहळा पाळधी येथील राजगड कार्यालय येथे संपन्न झाला.यावेळी अशोक आनंदा पाटील, राजु कोंडु पाटील,
रामदास पंढरी पाटील, पांडुरंग काशिनाथ पाटील, दिपक मधुकर चव्हाण, प्रभाकर भास्कर पाटील, रामेश्वर सोपान पाटील, निवृत्ती सिताराम पाटील, समाधान जनार्धन पाटील, मधुकर ज्ञानेश्वर शिंदे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. प्रसंगी युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी विश्वजित पाटील,युवासेना मुकेश जाधव, भराडी शिवसेना शाखाप्रमुख गणेश पाटील हे उपस्थित होते.
