अपरेशराजे तुपकरी
तब्बल 51 रक्तदात्यांनी केले रक्तदान मलकापूर येथील दाऊदी बोहरा समाज बांधवांचे विशेष असे योगदान आज या रक्तदान शिबीरात प्राप्त झाले. मलकापूर दाऊदी बोहरा समाजाचे आमील साहेब शेख शब्बीर भाई लोखंडवाला यांचा अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला व त्यांनी सुध्दा रक्तदान केले.
तसेच मलकापूर दाउदी बोहरा समाज ची संस्था अंजुमने नजमी व बीजीआय , रक्तदाता मलकापूर मदतकार्य बहुद्देशीय संस्था , हिंदी मराठी पत्रकार संघ मलकापूर यांनी मिळून एक मोलाचे कार्य पूर्णत्वास नेण्यात विशेष भर टाकली आहे.
प्रत्येक रक्तदात्यास रेड प्लस ब्लड सेंटर व हिंदी मराठी पत्रकार संघ यांचेकडुन प्रमाणपत्र व फ्री डोनर कार्ड देण्यात आले रक्तदान शिबिराच्या कार्यातून वैश्विक समाजाची संकल्पना दृढ होत आहे. ‘रक्तदान शिबिर संयोजकांमुळे समाज सुंदर होत आहे. दुसऱ्यासाठी जगणे, हेच खरे जगणे आहे. ‘येणाऱ्या काळात रक्ताची कमतरता जाणवणार असली तर अशा विशेष कार्यामुळे रक्त उपलब्ध होण्याची योजना बनली आहे. आपण धर्मस्थळांना भेटी दिल्यानंतर दान करण्यासोबत रक्तदान करायला हवे अशी संकल्पना प्रत्येकाच्या मनात रुजू करणे आवश्यक आहे.
रक्तदाता मलकापूर मदतकार्य बहुउद्देशीय संस्था मलकापूर संस्थापक अध्यक्ष अपरेशराजे तुपकरी यांचे मोलाचे मार्गदर्शन नेहमीच लाभत असते

