पत्रकार राहुल संबारे बेलाड
बेलाड गावात अवैध दारु वरली मटका बंद करण्यासाठी गावातील ग्रामपंचायत मधे ग्रामपंचायत सदस्या मा. सौ. दिपमाला देवानंद इंगळे व सोबत आठ सदस्यां तर्फे सचिवांना पत्र देण्यात आले मलकापूर तालुक्यातील बेलाड गावामधे अवैध दारू विक्री चा जोर वाढला असुन त्यामुळे गावातील तरुण व माणसे मोठ्या प्रमाणात व्यसनाच्या आहारी जात आहेत. तथा या मुळे गावात भांडणांचे प्रकार वाढत आहेत. गावात दारु बंदी व्हावी व तसा ठराव घ्यावा यासाठी वारंवार बेलाड ग्रामपंचायत ला वारंवार निवेदन देवून आंदोलन करण्यात आले आहे तसेच स्थानिक पोलिस प्रशासन यांना सुद्धा या बाबत निवेदन दिले आहे. परंतु अद्याप बेलाड गावातील दारु बंदी करण्यात आली नाही. बेलाड मुक्त पणे अवैध दारु विक्री केली जात असुन नागरीक देखील दारुपिण्यासाठी व घेण्यासाठी येतात
दारु बाजांकडून गलीबोळात व चौकाचौकात अनेक वेळा गडबड गोंधळ करीत अश्लील शिवीगाळ केली जाते. त्यामुळे येथील शाळेतील शेकळो विद्यार्थी, विद्यार्थीनी व नागरीकांना व महीलांना खूप त्रास सहन करावा लागत आहे युवक वर्ग देखील मोठ्या प्रमाणात दारु च्या आहारी जात आहे. कित्येक लोकांना दारु मुळे मुत्यु सुद्धा ओढावला आहे गावात असणारे दारु चे दुकान प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या गुन्हेगाराचे, गुन्हेगारी चे केंन्द्र बनले आहे.
अवैध दारु मुळे महीलांना घरगुती समस्या निर्माण होते हे उघड सत्य आहे याची माहीती राज्य महिला आयोगाकडून समोर येत आलेली आहे. भारतीय राज्यघटनेतील कलम 47 नुसार नागरीकांचे आरोग्य संभाळणे हे नागरीकांचे प्रथम कर्तव्य आहे. त्या अनुशंगाने आपण बेलाड गावातील सुरु असलेली अवैध दारु विक्री पुर्णपणे बंद करावी व तसा ग्रामपंचायत बेलाड तर्फे ठराव पारीत करावा . व राज्यघटनेचा व जनमतांचा आदर करावा ही विनंती. गावातील दारु विक्री बंद न झाल्यास आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन उपोष्ण सुरु करणार तथा यामधे होणार्या परीणामांना सर्वस्वी शासन प्रशासन जबाबदार राहील. अशे निवेदन सचीवांकडे देण्यात आले. यावेळी
सौ.दिपमाला देवानंद इंगळे, श्री. सचिन संतोष संबारे, सौ.प्रतिभा विनोद इंगळे,सौ.मायावती दादाराव इंगळे, श्री.सागर निनाजी संबारे, श्री.ईच्छाराम डिगांबर संबारे, सौ.दुर्गा सुनील संबारे, सौ. प्रिया विजय काटे, श्री. संदीप श्रीक्रुष्ण निंबोळकर हे सर्व उपस्थित होते.
