Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

इस्लामिक क्वीज कॉम्पिटिशनचे आयोजन; तालुक्यातील ६४२ विद्यार्थ्यांचा सहभाग

Responsive Ad Here

असलम परवेज लोणार

              रविवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ११ ते २:०० वाजे दरम्यान डॉ. जाकिर हुसैन इंग्लिश स्कूल लोणार द्वारे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये तालुक्यातील शाळांमधून एकूण ६४२ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला .


             यामध्ये मोहम्मद पैगंबर यांच्या जीवनावर आधारित १०० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्नावर आधारित पेपर घेण्यात आला. तज्ञ परीक्षक नबिल शेख सर,फैजान सर, रफिक सर, शहेबाज सर, फहीम सर, जाधव सर, अलीम सर, शोएब सर, मुसद्दिक सर व महिला शिक्षकांनी तातडीने पेपर तपासून निकाल घोषित केले. 

              यामध्ये वर्ग ५ ते ८ वीपर्यंत च्या जुनियर ग्रुप मधून अयाज रमजान परसुवाले (डॉक्टर झाकीर हुसेन लोणार) याने प्रथम क्रमांक पटकावून बक्षीस प्राप्त केले तर मसीरा शेख अब्बास (डॉक्टर झाकीर हुसेन लोणार) हिने द्वितीय क्रमांक प्राप्त करून बक्षीस प्राप्त केले, तसेच हफसा फातिमा रिजवान खान (नगरपरिषद उर्दू मिडल स्कूल लोणार) या विद्यार्थिनींनी तृतीय क्रमांक घेऊन बक्षीस प्राप्त केले.               

                  तसेच वर्ग ९ ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या सीनियर ग्रुप मधून तहेसीन फातिमा शेख आसिफ, (डॉक्टर जाकिर हुसैन कॉलेज लोणार) हिने प्रथम क्रमांक पटकावून वाटर फिल्टर बक्षीस प्राप्त केले, तर अजीज खान अकबर खान (नॅशनल उर्दू हायस्कूल सुलतानपूर) याने दुसरा क्रमांक पटकावून गॅस शेगडी बक्षीस म्हणून प्राप्त केले तसेच मुदसि्सर खान नसिर खान (डॉक्टर झाकीर हुसेन कॉलेज लोणार) याने तृतीय क्रमांक पटकावून बक्षीस प्राप्त केले.