Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

२१००महिलांना साडी चोळीचे मान्यवरांच्या हस्ते वाटप

Responsive Ad Here


          मराठा मंगल कार्यालय मलकापूर येथे मलकापूर काँग्रेसचे शहराध्यक्ष मा.राजुभाऊ पाटील यांनी आयोजित महिलांचे "सबलीकरण व सक्षमीकरण" व्हावे या हेतूने कोरोना काळात आपल्या जीवाची, परिवाराची पर्वा न करता मलकापूर शहरात अहोरात्र सेवा देणाऱ्या आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या सेविका अश्या माताभगिनीच्या कार्याची दखल घेऊन महात्मा गांधीजी व लाल बहाद्दूर शास्त्रीयांच्या जयंतीच्या व आमचे मार्गदर्शक मा.मुकुलजी वासनिक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, नवरात्रीच्या उत्साहात दसरा, दिवाळीची आपल्या भावाची एक भेट म्हणून २१०० माताभगिनींना साडी,चोळी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

          जवळपास सर्व २१०० महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या त्यावेळी मान्यवरांची समायोजित भाषणे झाली.  आमदार राजेश एकडे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की माझ्या मतदारसंघात महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणखी नवीन योजना उपलब्ध करून देणार.उपस्थित सर्व माता भगिनींना मी नतमस्तक होतो.

     चल चरखा या विषयावर महिलांना कश्या प्रकारे आपण सक्षम बनवून त्यांच्या उदर निर्वाहासाठी रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.अतिशय नियोजनबद्ध सर्व २१००महिलांना साडी चोळीचे  वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी उपस्थित प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा.श्यामभाऊ उमाळकर,डॉ. अरविंद कोलते, हाजी रशीदखान जमादार, हरिषभाऊ रावळ, मनोजभाऊ देशमुख, प्रमोददादा अवसरमोल,सौ. मंगलाताई पाटील, सौ. मंगलाताई पाटील,बंडूभाऊ चौधरी, शिरिषभाऊ डोरले,डॉ. अनिल खर्चे सर, तुषारभाऊ पाटील,किसनराव पाटील,प्रीतिताई भगत, डॉ. नम्रता पाटील, अनिलभाऊ गांधी, डॉ. सलीम कुरेशी,जाकीर मेमन,सिद्धांत इंगळे,निवृत्ती तांबे,आनंद पुरोहित,गजेंद्र डवले, गजुभाऊ सोनोने,उस्मान मास्टर, वाजिदभाई,कैलास काळे,अनिल मुंधोकार, विनुभाऊ काळे,ईश्वर भदाले,आकाश ढोलकर,रामेश्वर गोरले,गोलू बागडे,भूषण सनिसे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते.

  कार्यक्रमाची प्रस्तावना कार्यक्रमाचे मुख्य आयोजक मा.राजुभाऊ पाटील यांनी केले, उत्कृष्ट सूत्र संचलन मा.बंडूभाऊ चवरे यांनी तर आभार प्रदर्शन समाधान इंगळे सर यांनी केले.