राहुल संबारे बेलाड प्रतिनिधी
बेलाड ग्रामपंचायत ची चूक मुक्या प्राण्यांच्या जिवावर बेतत आहे. बेलाड च्या हद्दीत असलेले मलकापूर नगरपालिका चे डंपिंग राऊंड झोपायला दिली वसरी आणि पायपसरी अशी अवस्था मलकापूर नगरपरिषद च्या प्रशासनाने केली आहे बेलाड मध्ये ज्या हद्दीत मलकापूरच्या कचरा टाकल्या जातो.
त्या कचऱ्यात मास व हाडे कोंबड्यांचे पीस असतात त्यामुळे ईथे जे कुत्रे असतात ते हे फुललेले मास खातात व हेच नंतर कुत्रे पीसाळेले होवून अन्य जनावरती आता हल्ले करायला लागले आहेत व अनेक प्रकार चे रोग बेलाड गावात पसरत आहे तरी लवकरात लवकर या वर उपाय येजना करावी जने करुन भविष्यात असे प्रकार घडू नये व मानवी जीवावर त्याचा विपरीत परिणाम होऊ नये म्हणून नगर परिषद मलकापूर व बेलाड ग्रामपंचायत प्रशासन यांने विशेष लक्ष द्यावे व त्या शेतकऱ्याला झालेला नुकसान भरपाई करुन द्यावी. अन्यथा बेलाड मलकापूर नगरपालिका प्रशासन व बेलाड ग्रामपंचायत प्रशासना विरोधात ग्रामस्थांन तर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल.
