जामनेर प्रतिनिधी
येथील शहरातील प्रकाश नगर भागातील सामाजिक व आध्यमिक कार्यकर्त्यां श्रीमती वैशाली विलास चौधरी यांना राज्यस्तरीय देण्यात येणारा आदिशक्ती मुक्ताई स्मृती गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आत्मौनती व विश्वशांती साधक संस्था मुंबई मर्यादित महाराष्ट्र आदिशक्ती मुक्ताई (ज्ञानपीठ) (गुरुकुल) वारकरी शिक्षण संस्था बीड यांच्या संयुक्त विद्यमानाने तसेच विराट गौरव समिती पुणे तथा माईस एम आय टी महाविद्यालय पुणे अखंड मानवता संमेलन यांचे सहकार्यातून पुणे येथील प्रोग्रेसिदध एज्युकेशन सोसायटी येथे नुकताच कार्यक्रम संपन्न झाला
समाजकार्य व राजकीय त्याचप्रमाणे अध्यामिक क्षेत्रात व संस्कार श्रम कार्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस राज्यस्तरीय आदिशक्ती मुक्ताई स्मृती गौरव पुरस्कार 2022 जाहीर करण्यात येतो त्याच अनुषंगाने येथील समाजसेविका श्रीमती वैशाली विलास चौधरी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती लोकसभेचे माजी सभापती सुमित्रा महाजन या प्रमुख पाहुण्याच्या उपस्थित हा स्मृती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी सदानंद मोरे अध्यक्ष महा रा हा सं माणिकराव चव्हाण अध्यक्ष दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट पुणे कृष्णकुमार गोयल अध्यक्ष कोहिनूर ग्रुप समूह गजानन एकबोटे अध्यक्ष प्रोग्रेस सिद्ध एज्युकेशन सोसायटी सोपान काका वाल्हेकर महाराज कार्याध्यक्ष नागेश मोरे उपाध्यक्ष श्रीमती मीनाक्षी मोहिते पाटील जनसंपर्क अधिकारी सत्यजित खांडगे यांची लक्षणे उपस्थित होती वैशाली चौधरी यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला वैशाली चौधरी यांना पुरस्कार मिळविला बद्दल त्यांचा अनेक मान्यवरांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या
