असलम परवेज,लोणार
महाराष्ट्र रत्न सन्मान सोहळा मुंबई येथे रविवार दिनांक 30 ऑक्टोबर 2022 रोजी संपन्न झाला. आंतरराष्ट्रीय मानव अधिकार राजदूत संघटना, पोलीस मित्र माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण सेना, ऑल इंडिया अँटीकरप्शन पार्लमेंट कमिटी, भारतीय महाक्रांती सेना व अखिल भारतीय पत्रकार हक्क संसद समितीच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र गौरव राज्यस्तरीय सन्मान सोहळा- 2022 चे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मंचावर टी एल विजया लक्ष्मी (बॉलिवूड अभिनेत्री), मुनी शाम प्रभु विजय, कांचन अवस्थी (बॉलीवूड अभिनेत्री),राज दमरे (मोडलींग, अभिनेता), अविनाश सकांडू (राष्ट्रीय अध्यक्ष) सह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
या अंतर्गत मोहम्मद रिजवान जड्डा, लोणार यांची उल्लेखनीय सामाजिक कामगिरीची दखल घेऊन 'महाराष्ट्र रत्न' -2022 या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार सन्मान सोहळ्या मध्ये मुंबई येथे त्यांच्या सोबत त्यांचे मित्र वसिफ खान मनसबखान, शेख इक्बाल शेख तुराब , रिजवान खान करामत खान, मतीन खान सोबतच इतर शहरातून सामाजिक,राजकीय मंडळी, जमियते उलेमाचे पदाधिकारी, वकील मित्र मंडळाचे अनेक सदस्य व कॉलेज जीवनातील मित्र मंडळींची विशेष उपस्थिती होती.
यंदाचा महाराष्ट्र रतन पुरस्कार रिजवान जड्डा यांच्या माध्यमातून लोणारच्या वाटेवर आल्याने सर्वत्र रिजवान जड्डा यांचे कौतुक करून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. व मित्र परिवारामध्ये मोठे जल्लोष साजरे करण्यात येत आहे.
