जामनेर प्रतिनिधी
येथील बोहरा सेंट्रल स्कूल सभागृहात आज सकाळी बारा वाजता जामनेर विधानसभा मतदारसंघाची शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीसाठी रावेर लोकसभा शिवसेना संपर्कप्रमुख विलास जी पारकर प्रमुख मार्गदर्शन केले
या बैठकीत संपर्कप्रमुख विलास पारकर साहेब यांनी सांगितले की रावेर लोकसभा मतदारसंघात तीन व चार नोव्हेंबर रोजी चोपडा व मुक्ताईनगर येथे शिवसेना उपनेते सुषमा अंधारे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली महाप्रबोधन यात्रा येणार आहे या निमित्त गद्दार च्या मतदार संघात शिवसेना उपनेते सुषमा अंधारे हे आपले जाहीर सभेतून विचार मांडणार असून या महाप्रबोधन यात्रेसाठी तीन व चार नोव्हेंबर रोजी होणाऱ्या चोपडा व मुक्ताईनगर येथे सुषमा अंधारे यांच्या जाहीर सभेला जामनेर विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान केले या बैठकीत सुरुवातीला सहसंपर्कप्रमुख डॉक्टर मनोहर पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख दीपक सिंग राजपूत जिल्हा समन्वयक गजानन मालपुरे तालुका संपर्कप्रमुख श्रीकांत जी पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले
याप्रसंगी रावेर तालुका संपर्कप्रमुख मोहन मसुरकर पत्रकार गणेश पांढरे एडवोकेट ज्ञानेश्वर बोरसे युवा नेते राहुल चव्हाण विधानसभा क्षेत्र प्रमुख नीलकंठ पाटील जिल्हा उपसंघटक सांडू गुरव शहर प्रमुख अतुल सोनवणे ज्ञानेश्वर जंजाळ अशोक जाधव सुकलाल बारी विलास देशमुख सुरेश राजहंस विष्णू सोनवणे उपशहर प्रमुख चव्हाण युवा सेना तालुका अधिकारी विशाल लामखेडे मयूर पाटील तुकाराम गोपाल शेंदुर्णी शहर प्रमुख भैया गुजर मुकेश जाधव विशाल भोई महिला संघटिका मीनाताई शिंदे सुधाकर शेठ सराफ उस्मान भाई नागेश्वर पाटील मोहन जोशी कुंदन भदाने अरुण पाटील प्रकाश सूर्यवंशी यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व युवा सेना तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीचे सूत्रसंचालन युवा सेना उपजिल्हाधिकारी विश्वंजित राजे पाटील प्रास्ताविक तालुका संपर्क नेते श्रीकांत पाटील तर आभार पत्रकार गणेश पांढरे यांनी मानले
