Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राष्ट्रपती द्रोपती मुर्म यांच्या हस्ते जामनेर येथील राज्यश्री पाटील यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायिका राजश्री तुळशीराम पाटील यांना आरोग्य खात्यातील देदीप्यमान कामगिरी बद्दल देण्यात येणारा ,#फ्लोरेस नाइरिगेल राष्ट्रीय पुरस्कार सात नोव्हेंबर सोमवार रोजी राष्ट्रपती भवन दिल्ली येथे महामहीम  द्रौपदी मुर्म यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.



राजश्री पाटील या मागील आठ वर्षापासून शेंदुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यात आहे तसेच त्यांनी पाचोरा तालुक्यातील लोहारा कळमसरा लोहटार आदी गावांमध्ये सेवा केलेली आहे त्यांचे मूळ गाव भिलखेडा तालुका जामनेर हे आहे त्यांचे माहेर पहूर तालुका जामनेर हे असून ते पहुर येथील स्वातंत्र्यसैनिक कैलासवासी बारकू बाळा पाटील यांची नात असून येथील श्रीराम ट्रस्ट मंदिराचे अध्यक्ष भाऊराव बारकू पाटील यांची सुकन्या आहे

राजश्री पाटील यांना मिळालेला बहुमान हा जळगाव जिल्हा तसेच जामनेर तालुक्यातील नागरिकांसाठी अभिमानास्पद आहे राजश्री पाटील धनगर समाजाच्या असून त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल  धनगर समाजाच्यावतीने संघर्ष समिती उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील माजी जिल्हा सदस्य राजधर पांढरे जिल्हा परिषद सदस्य अमित देशमुख सरपंच नीता पाटील पत्रकार गणेश पांढरे कृषी बाजार समितीचे सभापती संजय देशमुख आरोग्यद्युत अरविंद देशमुख उपसरपंच श्याम सावळे ईश्वर बाबूजी पतसंस्थेचे चेअरमन भास्कर पाटील शेंदुर्णी जीन प्रेस चे संचालक अरुण घोलप धनगर समाजाचे अनेक मान्यवरांनी तसेच नागरिकांनी राजश्री पाटील यांचे अभिनंदन केले आहे