Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

राज्यपाल भगतसिंग कोशारी व सुधांशु त्रिवेदी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करुन केला निषेध

Responsive Ad Here

जामनेर( प्रतिनिधी) 

महाराष्ट्रात आल्यापासूनच महापुरुषांवर बोलून वादाची मालिकाच सुरु केलेल्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्या प्रतिमांना आज जामनेर मध्ये जोडे मारो आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनाकडून आंदोलन करण्यात आले. जामनेर शहरातील राष्ट्रमाता जिजाऊ चौकात हे आंदोलन करण्यात आले. अखंड हिंदुस्तानाचे दैवत व आपले सर्वांचे आदर्श युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल चुकीचे व अपमान जनक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचा उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या कडुन जाहीरपणे निषेध करण्यात आला. 


महाराष्ट्राची व मराठी माणसाची अस्मीता व आदर्श असणाऱ्या छत्तपत्तींबद्दल चुकीचे वक्तव्य करणाच्या भाजपच्या व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भगतसिंग कोशारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु  त्रिवेदींचा जाहीर निषेधासोबतच आम्ही या दोन्ही शिवद्रोही विकृत व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आज पाचोरा उपविभागीय अधिकारी डॉ विक्रम बांदल यांच्या मार्फत निवेदन देऊन शासनाकडे त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या कडुन करण्यात आली आहे. 

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपुत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गरुड माजी शिवसेना शहर प्रमुख सुधाकर सराफ डॉक्टर प्रशांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विलास राजपूत विनोद माळी महादेव चव्हाण राजु जंटेलमेन उपसरपंच श्याम सावळे राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शंकर राजपूत शैलेश पाटील ईश्वर बारी शरद पांढरे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.