पत्रकार बेलाड राहुल संबारे
मलकापुर :- सडक्या विचाराच्या भगतसिंग कोश्यारीने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याने शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर, सहसंपर्कप्रमुख दत्ताभाऊ पाटील, जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, महिला आघाडी जिल्हाप्रमुख चंदाताई बढे, उपजिल्हा प्रमुख संजयसिंह जाधव, विधानसभा संघटक राजेशसिंह राजपूत, युवा सेना जिल्हाध्यक्ष शुभम पाटील, रविंद्र भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. २१ नोव्हेंबर रोजी मलकापुर तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख दिपक चांभारे पाटील, शहरप्रमुख गजानन ठोसर, यांच्या उपस्थितीत कोश्यारीची डफडे वाजवून मलकापूर शहरातुन अंत्ययात्रा काढण्यात आली.
तहसील चौकात चपला जोड्यांनी बदडून मुर्दाबाद... मुर्दाबाद.... कोश्यारी मुर्दाबाद, सुधांशु त्रिवेदी मुर्दाबाद... च्या घोषणा देत भर चौकात दफनविधी कार्यक्रम उरकण्यात आला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील, शहरप्रमुख गजानन ठोसर, उपशहरप्रमुख शकील जमादार, बाळुभाऊ पोलाखरे, शे. समद कुरेशी, रामराव तळेकर, कामगार सेना तालुकाप्रमुख रामभाऊ थोरबोले, शहरप्रमुख हरीदास गणबास, किसान सेना तालुकाप्रमुख महादेव पवार, शहरप्रमुख सै. वसीम, युवा सेना तालुकाप्रमुख गणेश सुशीर, शहरप्रमुख पवन गरुड, श्रीकृष्ण तायडे, दिपक कपले, श्यामसिंह हजारी, नासीरभाई, निलेश अहीर, अक्षय गणतीरे, सागर भोजने, शुभम ढोले, मयूर ताटर, गणेश पारस्कर, उखर्डा तांदुळकर, वैभव पाटील, कृष्णा सनीसे, वैभव ढोले, संतोष बोरले, अतुल तांदुळे, दीपक भोलनकर, मयूर कोलते, श्रीकृष्ण पाटील, गजानन ठोसर दुधलगांवकर सह शिवसैनिकांची उपस्थिती होती.
