Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

पहूर येथे निर्मल मशनरी अँड हार्डवेअर दुकान चोरट्यांनी फोडले

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

जामनेर तालुक्यातील पहुर बस स्टॅन्ड भर चौकात असलेल्या निर्मल मशनरी अँड हार्डवेअर हे आणण्यात चोरट्याने दहा नोव्हेंबर मध्यरात्री फोडून दुकानातील रोख रक्कम व वस्तू चोरून नेल्याची घटना घडली असून सविस्तर माहिती अशी की पहूर पेठ येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक राजेश लोढा यांच्या मालकीचे येथील बस स्टँड चौकात निर्मल मशनरी अँड हार्डवेअर या नावाने दुकान असलेले दुकानातील शेटरचे कडी कोंडा तोडून दुकानात घुसून दुकानातील ड्रॉप मधील सुटे पैसे व रोख रक्कम आठ ते दहा हजार रुपये तसेच दुकानातील तांब्याच्या ताराचे बंडल मोटारी चे बुशीग चे बंडल असे एकूण रक्कम 40 ते 50 हजार रुपयाची वस्तू चोरून अज्ञात चोरट्यांनी नेल्याची घटना घडली.


 असून निर्मल मशनरी हार्डवेअरची संचालक राजेश लोढा यांनी पहूर पोलीस ठाण्यात माहिती दिली असता पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड सहाय्यक फौजदार भरत लिंगायत पोलीस कॉन्स्टेबल ईश्वर देशमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन दुकानाची पाहणी केली आहे दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे ची तपासणी सुरू असून सीसीटीव्ही कॅमेरा चोरटे कैद झाल्याचे दिसून येते आहे सीसीटीव्ही कॅमेरा चोरट्यांचे चेहरे समोर आल्यास या घटनेचा तपास लागण्याची शक्यता जास्त आहे बाजूला असलेल्या नागवेली कृषी दुकानाचेही चोरट्यांनी शटर चे कुलूप तोडलेले आढळले असून पौर पहुर बस स्टँड परिसरात मध्यरात्री ही घटना घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढावी अशी मागणी व्यापारी व नागरिकांनी केली आहे