Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मराठा समाजातील दुर्लक्षित "समाजरत्नांचा" होणार सत्कार....

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

 अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जामनेर तालुका स्तरीय बैठक जिल्हा उपाध्यक्ष श्री.अतुलभाऊ सोनवणे व  तालुकाध्यक्ष श्री.राहुल भाऊ चव्हाण यांच्या उपस्थितीत "सोमेश्वर महादेव मंदिर सोनबर्डी" या ठिकाणी पार पडली. यावेळी समाजातील विविध विषयांवर चिंतन करण्यात आले. या बैठकीत जामनेर तालुक्यातील मराठा समाजाचे - मराठा समाजासाठी जामनेर तालुका म्हणून "सामाजिक कार्यालय व सभागृह" उभारण्यात यावे. याबद्दल सर्वानुमते तालुकास्तरीय संकल्प करण्यात आला.

    त्यासोबत मराठा समाजातील दुर्बल, निराधार घटकांचा शोध घेऊन अखिल भारतीय मराठा महासंघाच्या माध्यमातून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे मनोधैर्य वाढावे व समाजाने या घटकांची दखल घ्यावी या कारणास्तव अखिल भारतीय मराठा महासंघामार्फत या कार्यक्रमांची योजना निश्चित झालेली आहे.


       त्यासोबतच समाजातील सामाजिक,शैक्षणिक, धार्मिक, राजकीय, औद्योगिक व शासकीय क्षेत्रातील मराठा समाजामध्ये नावलौकिक झालेल्या व समाजाची उंची डौलाने उंचावणाऱ्या "समाज रत्नांचा" यथोचित सन्मान अखिल भारतीय मराठा महासंघ जामनेर तालुक्याच्या वतीने करण्यात येणार आहे असे आजच्या तालुका बैठकीत सर्वानुमते निश्चित करण्यात आलेले आहे.   यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे उपाध्यक्ष- श्री.विनोद पाटील, श्री.संजय सपकाळ- सरचिटणीस, श्री.विजय पाटील-सरचिटणीस, श्री.संतोष चिंचोले-कार्याध्यक्ष, श्री.अशोक पाटील-युवक अध्यक्ष श्री.नवल पाटील-कोषाध्यक्ष, श्री.ज्ञानेश्वर पाटील-शेतकरी, श्री.रमेश पाटील-चिटणीस सागर पाटील- युवक उपाध्यक्ष, दिपक पाटील- शहर अध्यक्ष मयुर पाटील- युवा सचिव   निखिल खंडारे- शहर युवा उपाध्यक्ष दशरथ पाटील- युवा कार्याध्यक्ष मंगेश इंगळे,विशाल सपकाळ, आदि मराठा महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.