Join Us

Call 8177880420 K Plus India News के शहर रिपोर्टर , जिल्हा रिपोर्टर, ब्यूरो चीफ, स्टेट हेड नियुक्त करना शुरू है.8177880420 K PLUS रिपोर्टर बनने के लिये संपर्क 8177880420

जामनेर तालुक्यात विषारी गावठी दारूमुळे युवकांच्या मृत्यूच्या प्रमाण वाढ ,एकाच महिन्यात चार युवकांचा मृत्यू

Responsive Ad Here

जामनेर प्रतिनिधी

अनेकांचा संसार उघड्यावर जामनेर शहरासह तालुक्यात  अवैध धंदे सैराट जामनेर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे अवैध धंदे बंद करण्याचे दिले निवेदन

जामनेर तालुक्यात विषारी गावठी दारू प्यायल्यामुळे मृतांची संख्या वाढतांना दिसून येत आहे. मृतांमध्ये युवकांचा समावेश. पहुर मध्ये एक महिन्यात चार युवकांचा मृत्यू या गावठी विषारी दारूमुळे झाल्याचे दिसून येत आहे.यापूर्वीही पहुर परिसरात अशाच प्रकारे विषारी दारू प्यायल्या मुळे अनेकांचे बळी गेले आहे आणि त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे.मिळालेल्या माहिती नुसार उसाचा रस, ग्लुकोज, पोटॅशियम नायट्रेट, मोहाची फुलं तसंच बटाटे, भात, जवस, मका असे स्टार्च असलेले पदार्थ एकत्र आंबवून एका विशिष्ट तापमानात त्याचे द्रव्यात रूपांतर करून गावठी दारू तयार केलं जाते.


    या गावठी दारूत आणखी नशा वाढविण्यासाठी त्यात विशिष्ट प्रकारचे घटक टाकले जातात त्या मुळे गावठी दारूचं संतुलन बिघडतं आणि ती विषारी धोकादायक बनते हे एक रंगहीन आणि ज्वलनशील गावठी दारू असते त्याचा गंध इथेनॉलसारखाच असतो. त्याचा वापर गावठी दारू म्हणून,  विकण्यासाठी केला जातो.  म्हणून हि गावठी दारू अतिशय विषारी असतं,हे लक्षात घेणं आवश्यक आहे. या विषारी गावठी दारूचा वापर पिण्यासाठी अजिबात करू नये.  ते प्यायल्यामुळे मृत्यू ओढवतो तसंच दृष्टी जाण्याचाही धोका असतो.

    हि गावठी दारू पहुर सह तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये मध्ये ठिक ठिकाणी सहज कमी दराणे उपलब्ध असल्यामुळे मजुरी करणारे युवक त्यात काही गवंडी काम करणारे मिस्तरी आणि मिस्तरीच्या हाताखाली असनारे युवक मजुर त्याच प्रमाणे शेती काम,हमाली, ड्रायव्हिंग आणि इतर हात मजूरी करणारे युवक या विषारी गावठी दारू कडे वळून तीचे श्रवण करून कमी पैशात जास्त नशा करतात.

काहि युवकांना तर याचे वेसन झालेले आहे या व्यसनाधीन पोटी ते जास्त प्रमाणात गावठी दारूचे श्रवण करतात त्या मुळे त्यांच्या शरीराच्या आतले अवयव निकामी होऊन ते लवकरच मृत्यूच्या दिशेने जातांना दिसून येत आहे.  तर काही युवक हे आजाराच्या आहरी जातांना दिसून येत आहे. जामनेर तालुक्यातील तसेच शहरातील अनेक भागात अवैध धंदे बोकाळले असून शहरातील अवैध धंदे बंद करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे जामनेर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले आहे


मृत्यू कसा होतो....?

डॉ.संदिप कुमावत वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र वाकोद यांनी दिलेल्या माहिती नुसार सामान्य गावठी दारू हि मीथाईल अल्कोहोल असते.त्या मुळे अल्कोहोल शरीरात लिव्हरच्या माध्यमातून अल्डिहाईडमध्ये बदलतं आणि अल्कोहोलचं फॉर्मलडिहाईड नावाच्या विषात रूपांतर होतं. या विषाचा सगळ्यांत जास्त परिणाम डोळ्यांवर होतो. आंधळेपणा हे त्याचं पहिलं लक्षण असते की जे बारा तासाच्या आत दिसते.एखाद्याने जास्त दारू प्यायली तर फॉर्मिक अॕसिड शरीरात तयार होतात त्यामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होऊन मृत्यू होते.


स्थानिक लोकप्रतिनिधींणी पुढाकार घेऊन हि विषारी गावठी दारू चा बंदोबस्त करून बंद करावी अशी अपेक्षा रहिवासीं कडून होत आहे. स्थानिक प्रशासना कडून जनतेला आवाहन करण्यात येत आहे कि ज्या ठिकाणी गावठी दारूची विक्री होत असेल तर लागलीच प्रशासनाला माहिती द्या त्यावर जागेवरच कारवाई करण्यात येईल.


     पहुर पोलिस स्टेशन च्या परिसरात कुठेही गावठी दारू विकली जात असेल तर माझ्याशी संपर्क साधवा लागलिच संबंधित व्यक्ती वर कारवाई होणार - प्रताप इंगळे पोलिस निरीक्षक पहुर पोलिस स्टेशन 

     पहुर परिसरात कुठेही गावठी दारू व अवैध्यरित्या कोणत्याही प्रकारची दारू विकली जात असेल तर कळवावे आम्ही दारू बंदी विभागाकडून लागलीच कारवाई करू--विलास पाटील  पाचोरा विभागीय अधिकारी  दारू बंदी विभाग

  कुठल्याही प्रकारची विषारी दारूचे श्रवण केल्या मुळे शरीराच्या आतले अवयव हळूहळू निकामी होत असल्यामुळे मृत्यू होतो. विशेषतः युवकांनी या विषारी दारू पासून लांबच राहव जेणेकरून आपल्या वर अवलंबून असलेला परिवार उघड्यावर येणार नाही. --डॉ.विनय सोनवणे वैद्यकीय अधिकारी पहुर ग्रामीण रूग्णालयात